Hair Care: केस लांब कसे वाढतात बांधल्याने की खुले ठेवल्याने? अनेकांचा चुकीचा समज

Last Updated:
केस किती लवकर वाढतील हे आपल्या आहार, केसांची काळजी आणि हेअर केअर रूटीन यावर अवलंबून असतं. तरीही केस खुले ठेवायचे की बांधायचे, याचे फायदे आणि तोटे पाहूया
1/8
सगळ्यांनाच आपले केस लांब, काळेभोर आणि दाट असावेत असं वाटतं. विशेषतः महिलांसाठी तर केस ही सौंदर्याची ओळख असते. म्हणूनच अनेकजणी हेअर ऑइल वापरतात, पार्लरमध्ये ट्रीटमेंट घेतात किंवा घरगुती उपाय करतात. पण एक प्रश्न कायम पडतो  केस खुले ठेवले तर जास्त वाढतात का, की बांधून ठेवले तर त्यांची ग्रोथ चांगली होते?

advertisement
2/8
केसांच्या वाढीवर काय परिणाम करतो?केस किती लवकर वाढतील हे आपल्या आहार, केसांची काळजी आणि हेअर केअर रूटीन यावर अवलंबून असतं. तरीही केस खुले ठेवायचे की बांधायचे, याचे फायदे आणि तोटे पाहूया

3/8
केस खुले ठेवल्यासखुले केस धूळ, प्रदूषण आणि उन्हाच्या थेट संपर्कात येतात. त्यामुळे केस कोरडे पडतात, तुटतात आणि कोंडा वाढतो. सतत खुले ठेवल्याने केस कमकुवत होतात आणि गळतीही वाढू शकते.
शिवाय केस गुंततात आणि विंचरताना अधिक तुटतात. परिणाम: केसांची वाढ मंदावते आणि ते निस्तेज दिसतात.
केस खुले ठेवल्यासखुले केस धूळ, प्रदूषण आणि उन्हाच्या थेट संपर्कात येतात. त्यामुळे केस कोरडे पडतात, तुटतात आणि कोंडा वाढतो. सतत खुले ठेवल्याने केस कमकुवत होतात आणि गळतीही वाढू शकते.शिवाय केस गुंततात आणि विंचरताना अधिक तुटतात. परिणाम: केसांची वाढ मंदावते आणि ते निस्तेज दिसतात.
advertisement
4/8
केस बांधले की त्यांचे संरक्षण चांगले होते. वेणी, पोनीटेल किंवा सैलसा जूडा केल्याने धूळ आणि मातीपासून केस वाचतात. पण केस खूप घट्ट बांधले, तर टाळूवर ताण येतो आणि मुळांना नुकसान होतं.परिणामी केस घट्ट बांधल्याने केस गळणे किंवा पातळ होणे सुरू होऊ शकतं.

5/8
योग्य उपाय काय?केस नेहमी ना खुले ठेवावेत, ना खूप घट्ट बांधावेत दोन्ही गोष्टींमध्ये संतुलन ठेवा. घरी असताना हलकी वेणी किंवा सैलसा जूडा करा. झोपताना केस मोकळे ठेवण्यापेक्षा सैल वेणी बांधा. बाहेर जाताना स्कार्फ किंवा दुपट्ट्याने केस झाका, त्यामुळे उन्हापासून आणि प्रदूषणापासून संरक्षण मिळेल.

6/8
केसस वाढीसाठी काही सोप्या टिप्ससंतुलित आणि पौष्टिक आहार घ्या.
आठवड्यातून २ वेळा केसांना तेलाने मसाज करा.
हेअर मास्क किंवा नैसर्गिक उपाय नियमित वापरा.
ओले केस जोरात विंचरणं टाळा, हलक्या हाताने केस विंचरा.
केसस वाढीसाठी काही सोप्या टिप्ससंतुलित आणि पौष्टिक आहार घ्या.आठवड्यातून २ वेळा केसांना तेलाने मसाज करा.हेअर मास्क किंवा नैसर्गिक उपाय नियमित वापरा.ओले केस जोरात विंचरणं टाळा, हलक्या हाताने केस विंचरा.
advertisement
7/8
केस सुंदर आणि निरोगी ठेवायचे असतील तर त्यांना योग्य काळजी, आहार आणि विश्रांती द्या. केस खुले की बांधले यापेक्षा त्यांची नियमित काळजी घेणं अधिक महत्त्वाचं आहे.

8/8
(नोट : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे, न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही, आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)

OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement