त्या काळातले प्रसिद्ध गायक म्हणजे मोहम्मद रफी साहेब होते. ज्यांची सदाबहार गाणी अजूनही लोकांच्या ओठी आहेत. कारण ती गाणीच अशी आहेत की, ऐकली की मन तृप्त होते. मोहम्मद रफी साहेब यांचा हिंदी ,सिनेसृष्टीत खूपच दबदबा होता. त्यांनी चार दशकांपेक्षा जास्त गायनाच्या क्षेत्रात योगदान दिले आहे. त्यातील बहूतेक गाणी ही हिटच झाली आहेत. एवढ्या मोठ्या गायनाच्या करियर मध्ये त्यांच्या रोमँटीक आणि मधूर आवाजामुळे आजही त्यांची गाणी आठवणीत आहेत. त्यांचे असेच एक गाणे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत जे गाणं आपल्या मनातून कधीच जाणार नाही. या कारणामुळेच हे गाणे 48 वर्षांनंतरही प्रत्येकाच्या आवडीचे आहे. ते खूप ऐकले जाते. ते गाणे तूम्हाला आम्ही सांगतो.
advertisement
''तात्या विंचू येईल अन् चावेल'', संजय राऊतांचा महेश कोठारेंना भाजप प्रेमावर टोला
मोहम्मद रफी यांचे 'आइकॉनिक सैड सॉन्ग'
गायक मोहम्मद रफी यांचे गायण करियर 40 वर्षांपेक्षा जास्त होते. त्यांनी आपल्या कारकिर्दीत प्रत्येक शैलीच्या गाण्याला आपला आवाज दिला आहे. त्यातील काही गाणी अशी होती जी 'आइकॉनिक सॅड सॉन्ग' म्हणून ओळखली गेली. अजूनही श्रोते त्यांना ऐकत आहेत. ते गाणे 1977 मध्ये आलेला सिनेमा 'हम किसी से कम नहीं' यातील आहे. गाण्याचे बोल होते 'क्या हुआ तेरा वादा'. तो एक रोमँटीक सिनेमा होता. अभिनेते तारिक, काजल, किरण आणि ऋषि कपूर हे दिग्गज या सिनेमात होते. हिंदी सिनेमातील 'बेस्ट सॅड साँग' म्हणून या गाण्याला नोंदविण्यात आले आहे. 'हम किसी से कम नही' च्या या गाण्याला गीतकार मजरूह सुल्तानपुरी यांनी लिहीले होते. संगीत आर डी बर्मन यांचे होते. हे गाणे ऐकल्यावर आपले जीनवातील प्रेम नव्याने आठवायला लागते.
या सिनेमातील रफींची अजून तीन गाणी
मोहम्मदजींनी अजून तीन गाणी या सिनेमात गायले आहे. त्यात चांद मेरा दिल, हम किसी से कम नहीं टाइटल ट्रॅक आणि ए दिल क्या महफिल सारखी गाणी आहेत. 'क्या हुआ तेरा वादा' या गाण्यानेच हा सिनेमा ओळखला जातो.
