TRENDING:

Dairy Farm flyover : डेडलाईन ठरली! पिंपरीतील डेअरी फार्म पूल कधी खुला होणार? महत्त्वाचं अपडेट समोर

Last Updated:

Dairy Farm flyover : पिंपरीतील डेअरी फार्म पूल कधी खुला होणार याबाबत प्रशासनाने महत्त्वाची माहिती दिली आहे. ठराविक मुदतीत काम पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले असून नागरिकांना लवकरच वाहतुकीसाठी पूल उपलब्ध होणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पिंपरी : पिंपरी येथील नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. शहरातील महत्त्वाचा असलेला पूल लवकरच खुला होणार असून उद्घाटन किती होणार याची तारीखही समोर आलेली आहे.
डेअरी फार्म पुलाच्या कामाला वेग; प्रशासनाकडून मुहूर्त जाहीर.
डेअरी फार्म पुलाच्या कामाला वेग; प्रशासनाकडून मुहूर्त जाहीर.
advertisement

समोर आली तारीख

पिंपरी डेअरी फार्म येशील उड्डाणपुलाचे काम प्रगतिपथावर असून सध्या रेल्वे क्रॉसिंगवर स्टील गर्डर टाकण्याचे काम सुरु झाले आहे. अजून पाच दिवसांनतर म्हणजेच 21 मार्चपर्यंत दररोज दोन तासांचा ब्लॉक घेऊन हे काम पुर्ण करणार आहे. राहिलेले काम हे एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पूर्ण करण्यात येणार असून हा पुल त्यानंतर खुला करण्याचे नियोजन असल्याचे महापालिका प्रशासनाने सांगितले आहे.

advertisement

अनेकांना पिंपळे सौदागर, रहाटणी, पिंपरी कॅम्पमार्गे पिंपरी गावतातून पुणे-मुंबई महामार्गावर जाण्यासाठी वाहनांना याच पिंपरी डेअरी फार्म रस्ताने बाहेर पडावे लागते तर दुसरीकडे पुणे- मुंबई महामार्गावरुन पिंपरी कॅम्प आणि पिंपरी गावातून पुढे जाण्यासाठी याच मार्गाचा वापर करावा लागत होता. पण लोहमार्गावर फाटक पडल्यानंतर दोन्ही बाजूंनी वाहतूककोंडी होत होती.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
रेडलाईट एरियातलं ‘ते’ दृश्य पाहिलं, केरळच्या लीला ईसोंना ठरवलं, नागपुरात मोठं काम, Video
सर्व पहा

पिंपरी आणि परिसरातील रहिवाशांच्या सोयीसाठी तसेच कोंडी दूर करण्याच्या उद्देशाने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मार्फत पिंपरी डेअरी फार्म रस्त्यावर उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

advertisement

मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
Dairy Farm flyover : डेडलाईन ठरली! पिंपरीतील डेअरी फार्म पूल कधी खुला होणार? महत्त्वाचं अपडेट समोर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल