TRENDING:

पावसाचा कहर! सातारा जिल्ह्यात रेड अलर्ट, कोयनेतून वाढला पाण्याचा विसर्ग; सांगलीला बसणार फटका? 

Last Updated:

सोमवारी सकाळापासून जिल्ह्यात सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. पाटण, कराड, जावळी, वाई, सातारा आणि महाबळेश्वर या तालुक्यात मोठ्या प्रमाणात... 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सातारा : सोमवारी सकाळापासून जिल्ह्यात सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. पाटण, कराड, जावळी, वाई, सातारा आणि महाबळेश्वर या तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. पावसाचा जोर इतका आहे की, कोयना धरणात 65000 क्यूसेकने पाण्याची आवक सुरू आहे. त्यामुळे मागच्या 24 तासांत चौथ्यांदा विसर्गात वाढ करण्यात आली आहे. त्याचबरोबर धरणाचे सर्व दरवाजे 8 फूटांनी उघडून 53 हजार 300 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
Satara rain update
Satara rain update
advertisement

सांगली जिल्ह्याला बसणार फटका

कोयना नदीवरील तांबवे, निसरे हे बंधारे आणि संगमनगरचा धक्का पूल व मूळगावचा पूलही पाण्याखाली गेलेला आहे. कोयना धरणात सध्या 99 टीएमसी पाणीसाठा आहे. हवामान विभागाकडून सातारा जिल्ह्याला 'रेड अलर्ट' देण्यात आला आहे. पाऊस असा कोसळत राहिला तर कोयना नदीच्या काठच्या गावाना जबरदस्त फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेषत: नदीकाठच्या गावांनाही त्याचा फटका बसणार आहे. कृष्णा अन् कोयना नदीच्या पाण्यामुळे सांगली जिल्ह्याला पुराच्या पाण्याचा फटका बसण्याची शक्यता आहे.

advertisement

आणखी टप्प्याटप्प्यात पाण्याची विसर्ग होणार

कोयना धरण व्यवस्थापकांकडून मिळालेल्या माहितीनुसार या परिसरात पाऊस जोरदार झाल्यामुळे सोमवारी दुपारी धरणाचे 6 वक्री दरवाजे दीड फूटांवरून 3 फूट आणि रात्री 8 वाजता 5 फूटांवर उचलले. रात्री पुन्हा पावसाचा जोर वाढल्यामुळे 7 फूटांवर दरवाजे उचलण्यात आले. त्यामधून प्रतिसेकंद 44 हजार 800 आणि वीजगृहातून वीजनिर्मिती करून 2100 क्यूसक पाणी पूर्वेकडे कोयना नदीपात्रात सोडण्यात आले आहे. पावसाची आवक जशी वाढले, तसतसे पूर्वेकडे टप्याटप्यात ज्यादा पाणी सोडण्यात येणार आहे.

advertisement

हे ही वाचा : Marathwada Rain: मंगळवार पावसाचा! छ. संभाजीनगर ते बीड धो धो कोसळणार, मराठवाड्यात पुन्हा अलर्ट

हे ही वाचा : 72 तासांपासून झोडपलं, आजही पावसाचा हाहाकार! मुंबईकरांची मोठी तारांबळ! शाळा-कॉलेज बंद, परीक्षा पुढे ढकलल्या

मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
पावसाचा कहर! सातारा जिल्ह्यात रेड अलर्ट, कोयनेतून वाढला पाण्याचा विसर्ग; सांगलीला बसणार फटका? 
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल