शहरातील खरी समस्या काय?
कोल्हापुरातील नागरिक भटक्या कुत्र्यांच्या त्रासाने हैराण झाले आहेत. अनेक गल्ल्यांमधून पायी चालणे किंवा दुचाकीवरून जाणेही धोकादायक बनले आहे. हे मोकाट कुत्रे नागरिकांच्या अंगावर धावून जात आहेत. या गंभीर समस्येकडे मात्र पालिका प्रशासन दुर्लक्ष करत असून, भटक्या कुत्र्यांना पकडणे किंवा त्यांचे निर्बिजीकरण करण्याच्या मोहिमेला खीळ बसली आहे.
advertisement
पाळीव श्वानांसाठी महापालिकेचा नवा 'फतवा'
महापालिकेने रोटविलर, पिटबुल, जर्मन शेफर्ड आणि डॉबरमन यांसारख्या काही जातींना 'अतिहिंस्त्र' ठरवत त्यांच्यासाठी नवे नियम लागू केले आहेत. या नियमांचे पालन न केल्यास, श्वान थेट जप्त करून मालकावर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
काय आहेत नवे नियम?
- श्वानाला बाहेर फिरवताना गळ्यात पट्टा किंवा साखळी (चेन/बेल्ट) घालणे बंधनकारक आहे.
- श्वानाच्या तोंडाला 'मझल' (जाळी) लावणे अनिवार्य आहे.
- या मझलमुळे श्वानाला कोणताही त्रास होणार नाही, याची काळजी मालकाने घ्यावी.
या निर्णयावर टीका होत आहे कारण, ज्या पाळीव श्वानांवर हे नियम लादले जात आहेत, त्यांची कोणतीही अधिकृत नोंद किंवा माहिती खुद्द महानगरपालिकेकडेच उपलब्ध नाही. त्यामुळे केवळ एखाद-दुसऱ्या घटनेवरून सरसकट सर्व पाळीव श्वानांना दोषी ठरवणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
हे ही वाचा : आताची सर्वात मोठी बातमी! मुंबई हायकोर्टाला बॉम्बने उडवण्याची धमकी, तातडीनं रिकामा केला परिसर
हे ही वाचा : 'मसाई पठारा'वर फिरायला जाताय? आता मोजावे लागणार प्रवेश 'इतके' पैसे, वन विभागाने लागू केले नवे नियम