'मसाई पठारा'वर फिरायला जाताय? आता मोजावे लागणार प्रवेश 'इतके' पैसे, वन विभागाने लागू केले नवे नियम

Last Updated:

Masai Pathar, Kolhapur : जैविक विविधतेने संपन्न असलेल्या आणि कोल्हापूरपासून अवघ्या 35 किलोमीटर अंतरावर असलेल्या प्रसिद्ध मसाई पठारावर फिरायला जाणाऱ्या...

Masai Pathar, Kolhapur
Masai Pathar, Kolhapur
Masai Pathar, Kolhapur : जैविक विविधतेने संपन्न असलेल्या आणि कोल्हापूरपासून अवघ्या 35 किलोमीटर अंतरावर असलेल्या प्रसिद्ध मसाई पठारावर फिरायला जाणाऱ्या पर्यटकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. या भागातील निसर्ग आणि वन्यजीवांचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने वन विभागाने 'मसाई पठार संवर्धन राखीव क्षेत्रात' प्रवेश करण्यासाठी शुल्क लागू केले आहे. या नियमाची अंमलबजावणी सुरू झाली असून, विनापरवाना प्रवेश करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही वन विभागाने दिला आहे.
का घेतला हा निर्णय?
मसाई पठारावरील समृद्ध जैविक विविधतेचे जतन करण्यासाठी राज्य वन्यजीव मंडळाने या 5.34 चौरस किलोमीटरच्या परिसराला 'संवर्धन राखीव क्षेत्र' म्हणून घोषित केले आहे. या निर्णयामुळे येथील वन्यजीवांच्या भ्रमणमार्गांचे संरक्षण होण्यास मदत होणार आहे. याच संवर्धनाच्या दृष्टीने पर्यटकांकडून नाममात्र शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पाचगणीपेक्षाही विस्तीर्ण असलेले पठार
advertisement
  • पन्हाळ्यापासून अवघ्या 8 किलोमीटरवर असलेले हे पठार हिरव्यागार गवताची शाल पांघरल्यासारखे दिसते.
  • हे पठार पाचगणीच्या टेबल लँडपेक्षाही मोठे असून, याची लांबी सुमारे 4 ते 5 किलोमीटर आहे.
असे असेल प्रवेश शुल्क
  1. दुचाकी : ₹20
  2. चारचाकी वाहन : ₹50
  3. कॅमेरा : ₹200
उपवनरक्षक धैर्यशील पाटील यांनी सांगितले की, "मसाई पठार हे जैविविधतेने समृद्ध असल्याने ते संवर्धन राखीव क्षेत्रात येते. या नैसर्गिक ठेव्याचे जतन करण्यासाठी शुल्क लागू करण्याचा निर्णय घेतला आहे."
advertisement
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'मसाई पठारा'वर फिरायला जाताय? आता मोजावे लागणार प्रवेश 'इतके' पैसे, वन विभागाने लागू केले नवे नियम
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement