काय घडले नेमके?
गुरुवारी संध्याकाळी आनंद जाधव आणि त्यांची पत्नी महाबळेश्वर शहरातील काम आटोपून आपल्या दुचाकीवरून देवळी गावाकडे परतत होते. तापोळा रस्त्यावरील चिखली परिसरातून जात असताना, खाद्याच्या शोधात असलेल्या एका माकडाने अचानक त्यांच्या चालत्या दुचाकीवर झडप घेतली. अनपेक्षित हल्ल्यामुळे आनंद जाधव यांचा गाडीवरील ताबा सुटला आणि दोघेही रस्त्यावर जोरात आपटले.
advertisement
या अपघातात आनंद जाधव यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांना तातडीने महाबळेश्वरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या पत्नीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
वाढता माकडांचा उपद्रव आणि ग्रामस्थांचा संताप
या घटनेनंतर देवळी आणि आसपासच्या गावांमध्ये शोककळा पसरली आहे. महाबळेश्वर परिसरात माकडांचा उपद्रव ही एक मोठी समस्या बनली आहे. पर्यटकांच्या हातातून खाद्यपदार्थ हिसकावणे, वाहनांवर उड्या मारणे, हे प्रकार नित्याचे झाले आहेत. यापूर्वीही अशा घटनांमुळे छोटे-मोठे अपघात झाले आहेत, पण आता एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. "वनविभाग आणि प्रशासनाने आतातरी जागे होऊन या माकडांचा बंदोबस्त करावा," अशी मागणी संतप्त ग्रामस्थांनी केली आहे.
हे ही वाचा : Pune News: पाय-हात अन् पाठीवर चावा! पुण्यातील सिंहगड परिसरात भटक्या कुत्र्यांचा मुलांवर हल्ला