TRENDING:

Wild Life : जंगलात गाडी पाहून हत्ती भडकला, रागात हल्ला करण्यासाठी आला आणि...

Last Updated:

जंगलामध्ये एकापेक्षा एक भयंकर प्राणी असतात. त्यामुळे जंगल सफारीवर जाताना अधिक काळजी घेण्याची गरज आहे. कधी कोणता प्राणी संतापेल, प्राण्यांना कशाचा राग येईल सांगता येत नाही.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : जंगलामध्ये एकापेक्षा एक भयंकर प्राणी असतात. त्यामुळे जंगल सफारीवर जाताना अधिक काळजी घेण्याची गरज आहे. कधी कोणता प्राणी संतापेल, प्राण्यांना कशाचा राग येईल सांगता येत नाही. त्यामुळे प्राण्यांना जवळून पहायला, वन्य जीवनाचा आनंद लुटण्यासाठी तुम्ही जर जंगल सफारीवर जात असाल तर सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. त्यामुळे जंगल सफारीवj जाताना सोबत अनुभवी लोक असणं आवश्यक आहे. कारण कधी काय परिस्थिती उद्भवेल भरवसा नाही.
जंगलात गाडी पाहून हत्ती भडकला
जंगलात गाडी पाहून हत्ती भडकला
advertisement

जंगल सफारी दरम्यानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये जंगल सफारीवर आलेली गाडी पाहून अचानक हत्तीला राग येतो आणि तो चवताळून पर्यटकांच्या गाडीवर हल्ला करायला धावतो. मात्र पुढच्याच क्षणी जे घडतं ते थक्क करणारं आहे.

लग्नात अन्नाची नासाडी होऊ नये म्हणून वापरली ट्रीक, Video पाहून नेटकरी करतायत कौतुक

advertisement

जंगल सफारीच्या समोर आलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, काही पर्यटक जंगल सफारी एन्जॉय करत आहेत. तोच त्यांच्या गाडीपुढे हत्तींचा कळप येतो. यातील एका हत्तीला पर्यटकांची गाडी पाहून राग येतो आणि तो रागात गाडीवर हल्ला करण्यासाठी धावतो. मात्र गाडीतील ड्रायव्हर अनुभवी असल्यामुळे तो ही परिस्थीती योग्य पद्धीनं हाताळतो.

गाडीतील ड्रायव्हर लगेत बाहेर येतो आणि हातानं काहीतरी अॅक्शन करतो. हे पाहून तो हत्ती माघारी फिरतो आणि मोठं संकट टळतं. त्यामुळे जंगल सफारीवर जाताना सोबत असलेली व्यक्ती अनुभवी, अचानक आलेल्या परिस्थितीला हाताळू शकते अशी हवी. सुदैवानं कोणताही मोठा अपघात घडला नाही आणि सगळे सुखरुप आहेत.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मक्याच्या दरात सुधारणा, सोयाबीन आणि कांद्याला आज काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

Ashfaq Ahmed नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर चांगलीच खळबळ उडवत आहे. लोक ड्रायव्हरच्या कौतुक करतायेत. त्यानं ज्या प्रकारे परिस्थिती सांभाळली त्यासाठी सलाम करत आहेत.

मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
Wild Life : जंगलात गाडी पाहून हत्ती भडकला, रागात हल्ला करण्यासाठी आला आणि...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल