लग्नात अन्नाची नासाडी होऊ नये म्हणून वापरली ट्रीक, Video पाहून नेटकरी करतायत कौतुक

Last Updated:

लग्न कार्यात बऱ्याचदा अन्न वाया जातं. पण असं होऊ नये म्हणून एका लग्नात एक आगळी वेगळी शक्कल लावली गेली.

व्हायरल व्हिडीओ
व्हायरल व्हिडीओ
मुंबई : लग्नाशी संबंधीत असंख्य व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे व्हिडीओ कधी मजेदार क्षणांचे असतात. तर कधी एखाद्या विधीचे. पण लग्नाशी संबंधीत एक आगळा वेगळा व्हिडीओ समोर आला आहे. जो सध्या अनेकांचं लक्ष आपल्याकडे वळवून घेत आहे.
खरंतर लग्न कार्यात बऱ्याचदा अन्न वाया जातं. पण असं होऊ नये म्हणून एका लग्नात एक आगळी वेगळी शक्कल लावली गेली. जी पाहून तुम्ही नक्कीच कौतुक कराल. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकांनी त्यावर भरभरुन कमेंट्स केल्या आहेत आणि असा प्रकार लग्नात यावा अशी इच्छा देखील व्यक्त केली आहे.
व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की, जेवल्यानंतर एक व्यक्ती उरलेल्या अन्नासह थाळी डंपिंग टबमध्ये ठेवण्यासाठी जात आहे. यादरम्यान एक व्यक्ती त्याला थांबवतो आणि समोरच्या स्टॉलकडे इशारा करतो. जिथे टेबलावर अनेक बॉक्स दिसतात, ज्यावर पदार्थांची नावे लिहिलेली असतात आणि उरलेले अन्न त्याच बॉक्समध्ये ठेवण्यासाठी सांगितले जाते. त्यानंतर तेथे जाऊन ती व्यक्ती आपल्या ताटातील पदार्थ समोरील डब्यात काढून ठेवते. ज्यानंतर या व्यक्तीला एक फुल देखील मिळलं.
advertisement
या जमा केलेल्या जेवणाला गरजू लोकांना तसेच प्राण्यांना देणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र याचं नेमकं काय केलं जाणार आहे, हे कळू शकलेलं नाही.
View this post on Instagram

A post shared by Tuba Warsi (@arey_tubaa)

advertisement
हा व्हिडिओ arey_tubaa नावाच्या अकाऊंटने इन्स्टावर शेअर केला आहे. या व्हिडीओ दोन लाखांहून अधिक लोकांनी याला लाईक केले आणि ही संख्या वाढतच चालली आहे आणि करोडो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.
view comments
मराठी बातम्या/Viral/
लग्नात अन्नाची नासाडी होऊ नये म्हणून वापरली ट्रीक, Video पाहून नेटकरी करतायत कौतुक
Next Article
advertisement
Kolhapur:  मतदानाच्या दोन दिवस आधी कोल्हापुरात खळबळ! सतेज पाटलांनी फोडला 'टक्केवारी'चा बॉम्ब, महायुतीचा तो आमदार कोण?
मतदानाच्या दोन दिवस आधी कोल्हापुरात खळबळ! सतेज पाटलांनी फोडला 'टक्केवारी'चा बॉम्
  • महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भ्रष्टाचाराच्या आरोपांनी कोल्हापूरचे राजकारण

  • खळबळजनक व्हिडिओ काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

  • महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी पक्षाची मोठी कोंडी झाली असल्याची चर्चा

View All
advertisement