TRENDING:

कृषी हवामान : थंडीची मोठी लाट येणार! पशूंसह रब्बी पिकांची काय काळजी घ्याल? IMD ने दिला महत्वाचा सल्ला

Last Updated:
Maharashtra Weather Update : महाराष्ट्रासह देशभरात थंडीचा कडाका वाढला आहे. 19 नोव्हेंबरपर्यंत महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, झारखंड आणि राजस्थानमध्ये थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता आहे.
advertisement
1/5
थंडीची मोठी लाट येणार! पशूंसह रब्बी पिकांची काय काळजी घ्याल? IMD ने दिला सल्ला
महाराष्ट्रासह देशभरात थंडीचा कडाका वाढला आहे. श्रीलंकेच्या किनाऱ्याजवळ नैऋत्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाला आहे. त्यामुळे 19 नोव्हेंबरपर्यंत महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, झारखंड आणि राजस्थानमध्ये थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता आहे.
advertisement
2/5
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा सल्ला - थंडीचा शेती आणि पशुधनावर लक्षणीय परिणाम होतो. परिणामी, आयएमडीच्या अ‍ॅग्रोमेट विभागाने शेतकऱ्यांना पिके आणि पशुधनाची काळजी आणि संरक्षण याबाबत सल्ला दिला आहे. त्यानुसार, तापमानात घट होण्याचा शेतावर होणारा परिणाम कमी करण्यासाठी संध्याकाळी हलके पाणी द्या. भाजीपाला रोपवाटिका आणि छोट्या रोपांना पॉलिथिन किंवा मल्चिंगने झाकून ठेवा. केळीच्या घडांना 6% छिद्रित पॉलीबॅग्जने झाकून थंडीपासून वाचवा. असं सांगण्यात आले आहे.
advertisement
3/5
जनावरांची काय काळजी घ्याल? -   कडक थंडीमध्ये दूध देणाऱ्या जनावरांची योग्य काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. थंडीचा विशेषतः गायी-म्हशींच्या आरोग्यावर आणि दूध उत्पादनावर थेट परिणाम होतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी खालील उपाय नक्की करावेत.
advertisement
4/5
गोठा उबदार व कोरडा ठेवा - गोठ्यात थंडी वारा शिरणार नाही याची काळजी घ्या. शक्य असल्यास प्लास्टिकचे पडदे, ताडपत्री लावा. जमिनीवर कोरडे गवत, भूसा किंवा चटई ठेवा जेणेकरून जनावरांना गारवा जाणार नाही. गोठा नियमित साफ ठेवा. ओलसरपणा आजार वाढवतो.
advertisement
5/5
पिण्याचे पाणी कोमट द्या - अतिथंड पाणी जनावरांच्या पचनावर परिणाम करते. शक्य असल्यास सकाळ-संध्याकाळ कोमट पाणी द्या. यामुळे दूध उत्पादनही स्थिर राहते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/कृषी/
कृषी हवामान : थंडीची मोठी लाट येणार! पशूंसह रब्बी पिकांची काय काळजी घ्याल? IMD ने दिला महत्वाचा सल्ला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल