TRENDING:

Success Story : द्राक्षाला मिळत नव्हता भाव, शेतकऱ्यानं असं चालवलं डोकं, एक एकरात 9 लाख कमाई

Last Updated:
त्यांनी पारंपरिक द्राक्ष विक्रीऐवजी बेदाणा उत्पादनाकडे वळण्याचा निर्णय घेतला. मागील गेल्या तीन ते चार वर्षांपासून ते बेदाणा तयार करतात
advertisement
1/5
 द्राक्षाला मिळत नव्हता भाव, शेतकऱ्यानं असं चालवलं डोकं, एक एकरात 9 लाख कमाई
सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात द्राक्षाची लागवड केली जाते. मात्र द्राक्ष हंगाम तेजीत असला तरी बाजारात दर घसरल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
advertisement
2/5
द्राक्षांच्या दरात सध्याच्या घडीला सातत्याने घट होत असल्याने अनेक शेतकरी चिंतेत आहेत. या परिस्थितीवरच मात करण्यासाठी मोहोळ तालुक्यातील शेतकरी सागर भोसले यांनी नवा मार्ग निवडला आहे.
advertisement
3/5
त्यांनी पारंपरिक द्राक्ष विक्रीऐवजी बेदाणा उत्पादनाकडे वळण्याचा निर्णय घेतला. मागील गेल्या तीन ते चार वर्षांपासून ते बेदाणा तयार करतात. यामधून त्यांना चांगला आर्थिक फायदा मिळवत आहेत. त्यांनी एका एकरात थॉमसन जातीची द्राक्ष लागवड केली. पिकावर रोग येऊ नये यासाठी योग्य वेळी फवारणी करून त्यांनी दर्जेदार उत्पादन घेतले.
advertisement
4/5
द्राक्ष तयार झाल्यानंतर त्याची 150 दिवसांत तोडणी केली जाते. त्यानंतर त्यांना शेडमध्ये वाळवण्यासाठी ठेवले जाते. 13 ते 15 दिवसांच्या प्रक्रियेनंतर तयार झालेला बेदाणा कोल्ड स्टोरेजमध्ये साठवला जातो. या बेदाण्याची विक्री ही सोलापूर आणि पंढरपूर बाजारात केली जाते.
advertisement
5/5
द्राक्ष लागवड ते बेदाणा उत्पादन या संपूर्ण प्रक्रियेस सुमारे 3 लाख रुपये खर्च येतो. एका एकरातून सर्व खर्च वजा करून सागर भोसले यांना 8 ते 9 लाख रुपयांचा नफा मिळत आहे. त्यांच्या या प्रयोगामुळे इतर शेतकऱ्यांसमोर एक नवा पर्याय उपलब्ध झाला असून, कमी दराच्या संकटावर मात करण्याचा मार्ग खुला झाला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/कृषी/
Success Story : द्राक्षाला मिळत नव्हता भाव, शेतकऱ्यानं असं चालवलं डोकं, एक एकरात 9 लाख कमाई
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल