TRENDING:

Success Story : पारंपरिक शेतीला शोधला दुसरा पर्याय, तरुणाने कमावला वर्षाला 11 लाख नफा!

Last Updated:
जुनेद सय्यद याची कहाणी इतर तरुणांसाठी खूप प्रेरणादायक आहे. शेतीला पर्याय म्हणून पोल्ट्री व्यवसाय एक चांगला पर्याय ठरू शकतो हे त्याने दाखवून दिलं आहे. कमी संसाधनातही मोठं यश मिळवता येतं, हे त्याच्या यशावरून स्पष्ट होतं.
advertisement
1/7
पारंपरिक शेतीला शोधला दुसरा पर्याय, तरुणाने कमावला वर्षाला 11 लाख नफा!
सध्याच्या घडीला तरूण शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करत आहेत. बीड जिल्ह्यातील चिंचाळा गावातील 27 वर्षीय तरुण जुनेद सय्यद याने शेतीसाठी आवश्यक पाण्याचा अभाव भासत असल्यामुळे पारंपरिक शेतीसोबतच दुसरा पर्याय शोधण्याचा निर्णय घेतला.
advertisement
2/7
त्याने काहीतरी वेगळं करण्याचा विचार केला आणि शेतीवर संपूर्ण अवलंबून राहण्याऐवजी पूरक व्यवसाय सुरू करण्याचं ठरवलं. याचवेळी त्याच्या एका मित्राने पोल्ट्री व्यवसाय सुरू करण्याचा सल्ला दिला आणि जुनेद याने त्याचा गांभीर्याने विचार करत प्रत्यक्षात तो सुरू करण्याची तयारी केली.
advertisement
3/7
पोल्ट्री व्यवसायाबाबत त्याने सुरुवातीला सखोल माहिती घेतली. बाजारपेठ, पक्ष्यांची निगा, त्यांना लागणाऱ्या सुविधा आणि मुख्य म्हणजे विक्री यावर त्याने बारकाईने अभ्यास केला. सुरुवातीला अडचणी आल्या कारण गावात अशा प्रकारचा व्यवसाय फारसा कोणी करत नव्हतं. पण ठरवलं होतं म्हणून त्याने धाडस केलं आणि एक वर्षापूर्वी या व्यवसायाची प्रत्यक्ष सुरुवात केली. सुरुवातीला छोट्या प्रमाणात पक्षी घेतले पण व्यवसायात थोडं स्थैर्य मिळाल्यावर पक्ष्यांची संख्या वाढवत नेली.
advertisement
4/7
आजच्या घडीला जुनेद सय्यद याच्याकडे सुमारे 6000 कोंबड्या आहेत. तो प्रत्येक 45 दिवसांनी एक नवीन बॅच तयार करतो आणि ती ठोक विक्री करतो. व्यवसायाची ही चक्रशृंखला त्याने व्यवस्थित रित्या आखून ठेवलेली आहे.
advertisement
5/7
पक्ष्यांच्या आहारावर विशेष लक्ष देत, स्वच्छता आणि वेळेवर लसीकरण यांचा योग्य समन्वय राखत तो व्यवसायात गुणवत्ता जपतो. यामुळे पक्ष्यांना व्यापाऱ्यांकडून चांगली मागणी मिळते आणि विक्रीदेखील वेळेवर होते.
advertisement
6/7
पोल्ट्री व्यवसायातून त्याला सध्या वर्षाकाठी किमान 11 लाख रुपये निव्वळ नफा मिळतो. खर्च, देखभाल, मजुरी आणि इतर गोष्टी वजा जाता हा नफा खूपच समाधानकारक आहे. विशेष म्हणजे त्याने हा व्यवसाय करताना कोणतीही मोठी गुंतवणूक न करता हळूहळू वाढ करत यश मिळवलं आहे. आज गावातील अनेक तरुण त्याच्याकडे मार्गदर्शन घेण्यासाठी येतात. ज्या ठिकाणी शेतीला मर्यादा आहेत तिथं जोडधंदा म्हणून अशा व्यवसायांना प्रोत्साहन दिलं पाहिजे, असं जुनेद सांगतो.
advertisement
7/7
जुनेद सय्यद याच्या या यशस्वी प्रवासातून हे स्पष्ट होतं की परिस्थितीवर मात करून प्रयत्न आणि योग्य नियोजनाच्या जोरावर कोणताही तरुण यशस्वी होऊ शकतो. केवळ सरकारी नोकरीच्या किंवा पारंपरिक शेतीच्या मागे न लागता स्वतःचा व्यवसाय उभारणं हेही एक उत्तम पर्याय ठरू शकतो. त्याची ही कहाणी आजच्या तरुणांसाठी नक्कीच प्रेरणादायक आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/कृषी/
Success Story : पारंपरिक शेतीला शोधला दुसरा पर्याय, तरुणाने कमावला वर्षाला 11 लाख नफा!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल