Success Story : शेतीला जोडधंदा म्हणून सुरू केला व्यवसाय, महिन्याला 3 लाख उलाढाल, शेतकऱ्यानं असं काय केलं?
- Reported by:Ravi Shivaji Shikare
- Published by:Mohan Najan
Last Updated:
Farmer Success Story: शेतकरी शेतामध्ये सध्या नवनवीन व्यवसाय सुरू करत आहेत. कैलास उदावंत या शेतकऱ्याने शेतीला जोड व्यवसाय म्हणून गावरान कोंबडी पालनाचा व्यवसाय सुरू केला.
advertisement
1/5

शेतकरी शेतामध्ये सध्या नवनवीन व्यवसाय सुरू करत आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील बोकुड जळगाव येथील कैलास उदावंत या शेतकऱ्याने शेतीला जोड व्यवसाय म्हणून गावरान कोंबडी पालनाचा व्यवसाय सुरू केला.
advertisement
2/5
हा व्यवसाय 3 वर्षांपूर्वी सुरू असून सुरुवातीच्या वेळी त्यांच्याकडे केवळ 50 पक्षी होते नंतर 1 हजार पक्षी झाले आणि आज रोजी उदावंत यांच्याकडे 2 हजार कोंबड्या आहेत. यातून दररोज एक हजार अंडी निघतात. दर महिन्याला 3 लाख रुपयांपर्यंत या कोंबडी पालनाच्या माध्यमातून उलाढाल होते आणि सर्व खर्च वजा दीड लाख रुपये नफा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
advertisement
3/5
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून अनेक शेतकरी या फार्मला भेट देत असतात. तसेच यापुढे शेतकऱ्यांना 100 ते 200 पक्षी देऊन तुम्ही अंडी विका यातून शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न मिळेल आणि आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही.
advertisement
4/5
कोंबडी पालनाचे काम करत असताना काही समस्या येतात, त्या समस्या आपण कशा पद्धतीने हाताळतो यावर सर्व काही अवलंबून असते. तसेच 2 हजार पक्ष्यांना दिवसभरातून 4 तास वेळ देतो सकाळी दोन तास आणि संध्याकाळी दोन तास असे वेळेचे नियोजन असल्याचे देखील लोकल 18 सोबत बोलताना उदावंत यांनी सांगितले.
advertisement
5/5
कोंबडी पालन व्यवसायातून दीड लाख रुपये महिन्याकाठी निव्वळ नफा मिळतो. हा आकडा उत्पन्न दर्शवत नाही तर ग्रामीण भागात शेतीसोबत जोडधंदा किती फायदेशीर ठरू शकतो हे सिद्ध करतात.त्यामुळे उदावंत यांनी शेतकऱ्यांना या व्यवसायात उतरण्याचे आवाहन केले आहे. योग्य नियोजन आणि समस्या सोडवण्याची वृत्ती असेल तर कोणताही व्यवसाय यशस्वी करता येतो असे या उदाहरणावरून समजते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/कृषी/
Success Story : शेतीला जोडधंदा म्हणून सुरू केला व्यवसाय, महिन्याला 3 लाख उलाढाल, शेतकऱ्यानं असं काय केलं?