Success Story : नोकरीसोबत जपली शेतीची आवड, माळरानात पिकवलं सोनं, 35 लाखांचा झाला नफा
- Reported by:Priti Nikam
- Published by:Mohan Najan
Last Updated:
शेतकरी म्हाळाप्पा गणपती मोटे यांनी नोकरीबरोबरच शेतीची आवड जोपासत डाळिंब झाडांची लागवड केली आहे. यामधून त्यांना 30 ते 35 लाख रुपये उत्पन्न मिळाले.
advertisement
1/7

प्रतिकूल हवामानात कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर सांगलीतील जत तालुक्यातील शेतकरी फळबागातून भरघोस उत्पन्न मिळवत आहेत. जत तालुक्यातील कुलाळवाडी येथील शेतकरी म्हाळाप्पा गणपती मोटे यांनी नोकरीबरोबरच शेतीची आवड जोपासत 2018 मध्ये त्यांनी आपल्या एक हेक्टर माळरान जमिनीत एक हजार डाळिंब झाडांची लागवड केली.
advertisement
2/7
सुरुवातीच्या चार- पाच वर्षात मनासारखे उत्पन्न मिळाले नाही. पण सध्या चांगले उत्पन्न मिळत असून 4 लाख 50 हजार खर्च वजा जाता, 30 ते 35 लाख रुपये उत्पन्न मिळाले.
advertisement
3/7
लहानपणापासूनच शेतीची आवड होती. पण नोकरी असल्याने दोन्ही बाजू सांभाळत उत्पादनावर मर्यादा येत होती. काशीनाथ धडस यांचे व्यवस्थापत आणि युवराज सावंत यांच्या मार्गदर्शनामुळे यंदा डाळिंबातून चांगले उत्पन्न मिळवले असल्याचे शेतकरी म्हळाप्पा मोटे यांनी सांगितले.
advertisement
4/7
डाळिंब पिकाबाबतची माहिती घेत त्यांनी योग्य नियोजन करत यंदा भरघोस उत्पन्न मिळविले आहे. मागील वर्षी त्यांना बागेतून 11 लाखांचे उत्पन्न मिळाले होते.
advertisement
5/7
पण यावर समाधानी न होता जास्त उत्पन्न मिळविण्यासाठी तज्ञांचे मार्गदर्शन घेत व्यवस्थापक काशीनाथ धडस यांच्या साथीने बाग फुलविली आहे.
advertisement
6/7
त्यांच्या एक हक्टर शेतामधून 20 टन डाळिंबांचे उत्पादन मिळाले. बाजारभावाचा अचूक अंदाज, पाणी व खतांच्या योग्य नियोजनामुळे मोटे यांना डाळिंबाचे चांगले उत्पन्न मिळाले आहे.
advertisement
7/7
70 टक्के सेंद्रिय व 30 टक्के रासायनिक खंताचा वापर करून मोटे यांनी डाळिंब पिकाचे नियोजन केले. शेतकऱ्यांनी योग्य नियोजन करत शेती केल्यास शेतीपासून निश्चित नफा कमविता येत असल्याचे माडग्याळ येथील कृषी सल्लागार युवराज सावंत सांगतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/कृषी/
Success Story : नोकरीसोबत जपली शेतीची आवड, माळरानात पिकवलं सोनं, 35 लाखांचा झाला नफा