काळ्या रानात पिकवलं सोनं, 20 गुंठ्यात 9 लाखांचा माल, युवा शेतकऱ्यानं कशी केली कमाल?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Priti Nikam
Last Updated:
Peru Farming: सध्याच्या काळात काही शेतकरी फळबागांच्या शेतीकडे वळत आहेत. सांगलीतील शेतकऱ्याने पेरूच्या शेतीतून 9 लाखांचं उत्पन्न घेतलंय.
advertisement
1/7

सध्याच्या काळात शेतकरी आपल्या शेतात वेगवेगळे प्रयोग करून भरघोस उत्पन्न घेत आहेत. सांगली जिल्ह्यात देखील काही शेतकरी फळबागांच्या माध्यमातून प्रगतशील शेती करत आहेत. पलूस तालुक्यातील बांबवडेचा शेतकरी पेरूच्या शेतीतून मालामाल झाला आहे. त्यांचा हाच प्रवास जाणून घेऊ.
advertisement
2/7
युवा शेतकरी विक्रम संकपाळ यांनी बांबवडे येथील 20 गुंठे शेतात पेरुची लागवड केली. त्यासाठी काळ्या जमिनीत उभी आडवी नांगरट केली. सात ट्रॉली शेणखत घालून तीन फुटी बेड तयार केले आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने 6 बाय 10 वरती खड्डे पाडून घेतले.
advertisement
3/7
जानेवारी 2022 मध्ये व्हीएनआर जातीच्या पेरूच्या कलमी रोपांची लागवड केली. 150 रुपयांप्रमाणे एक रोप खरेदी करत 400 रोपांची हवा खेळती राहील अशी लागण केली. ठिबकद्वारे पाणी तसेच इस्राइल पद्धतीने खतांचे नियोजन केले. तसेच पाणी आणि माती परीक्षणानुसार वेळोवेळी खतांची मात्रा देऊन झाडांची निगा राखली आहे.
advertisement
4/7
10 महिन्यांत झाडांची छाटणी घेतली आणि तिथून सात महिन्यांत पहिले पीक घेतले. या 20 गुंठे क्षेत्रातून पहिल्या वर्षी 5 टन पेरूचा माल आला. दर्जेदार पेरूस मुंबई मार्केटला प्रतिकिलो 64 रुपये भाव मिळाला. पहिल्याच छाटणीतून तीन लाख रुपयांचा नफा झाला.
advertisement
5/7
त्यानंतर झाडांची लगेच छाटणी घेऊन पुन्हा पीक धरले आणि पुढील सात महिन्यांत पुन्हा पेरू मार्केटला पाठवले. दुसऱ्या छाटणीनंतर निघालेल्या मालाला म्हैसूरची बाजारपेठ मिळाली. प्रतिकिलो 72 रुपये भाव मिळाला. यातून 6 लाखांचे उत्पन्न मिळाले.
advertisement
6/7
युवा शेतकरी विक्रम संकपाळ यांनी योग्य नियोजन करत तिसरी छाटणी घेतली असून यंदा 15 टन पेरू उत्पादनाचे टार्गेट ठेवले आहे. योग्य बाजारभावासह लाखोंचा फायदा अपेक्षित आहे. उन्हाची तीव्रता वाढताना लहान पेरू उन्हाच्या तडाख्यामुळे पिवळा पडत असल्याने त्यांनी झाडांना शेडनेटने झाकून घेतले आहे. तसेच पेरूला फोम आणि बॅगिंग करुन फळाचा दर्जा टिकवला आहे.
advertisement
7/7
वेळच्या वेळी कीटकनाशकाची फवारणी करत पेरूवर येणाऱ्या मिलिबग रोगापासून बचाव केला आहे. पेरू पिकाला कमी रोग आणि आटोक्यात येणारा असल्याने थोड्या काळजीने देखील चांगले उत्पन्न घेता येते. यासाठी पाण्याचे, खतांचे आणि शेतीच्या कामांचे वेळेत नियोजन महत्वाचे असल्याचा अनुभव शेतकरी विक्रम संकपाळ यांनी सांगितला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/कृषी/
काळ्या रानात पिकवलं सोनं, 20 गुंठ्यात 9 लाखांचा माल, युवा शेतकऱ्यानं कशी केली कमाल?