Banana Farming : सांगलीच्या थोरात बंधूंची कमाल, केळी लागवडीतून वर्षाला घेतायत 60 लाखांचं उत्पन्न, अशी करतात शेती
- Published by:Mohan Najan
- Reported by:Priti Nikam
Last Updated:
अलिकडे शेतकरी ऊस शेतीला बगल देत आधुनिक पद्धतीने वेगवेगळ्या पिकांचे प्रयोग करत आहेत. सांगलीच्या गोठखिंडी गावच्या थोरात बंधूंनी केळी लागवडीतून वर्षाला 60 लाखांचं उत्पन्न मिळवले आहे.
advertisement
1/7

अलिकडे शेतकरी ऊस शेतीला बगल देत आधुनिक पद्धतीने वेगवेगळ्या पिकांचे प्रयोग करत आहेत. सांगलीचा वाळवा तालुका ऊस पट्ट्यातील महत्त्वाचा भाग आहे. येथील शेतकरी ऊस इतर पिकांकडे वळत असताना केलेल्या प्रयोगामध्ये गोठखिंडी गावच्या थोरात बंधूंनी केळी लागवडीतून वर्षाला 60 लाखांचं उत्पन्न मिळवले आहे.
advertisement
2/7
गोटखिंडी गावच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले धैर्यशील थोरात व फत्तेसिंह थोरात हे प्रगतशील शेतकरी बंधू आहेत. गोटखिंडी गावामध्ये त्यांची तीस एकर शेत जमीन असून त्यापैकी दहा एकर शेतामध्ये उसाची लागवड करतात.
advertisement
3/7
दहा एकर शेत जमिनीवरती कोरडवाहू पिके घेतात. तर दहा एकर शेत जमिनीमध्ये ऊस इतर फायदेशीर पिकांचे प्रयोग करतात.
advertisement
4/7
दहा एकर क्षेत्रावर प्रगतशील शेतकरी संपतराव यादव यांच्या मार्गदर्शनातून केळी पिक घेतले. सुरुवातीला केळी शेतात मेंढ्या बसवून शेत खतवून घेतले.
advertisement
5/7
शेणखत घालून मशागत करून पाच फुटी सरीने झिगझॅग 1300 रोपे लावून घेतली. ठिबक सिंचन पद्धतीने पाण्याचे योग्य व्यवस्थापन केले. ठिबकद्वारेच रासायनिक खताची योग्य मात्रा दिल्यामुळे पिकाला त्याचा चांगला उपयोग झाल्याचे धैर्यशील थोरात यांनी सांगितले. मशागतीसह सेंद्रिय आणि रासायनिक खतांचा योग्य वापर करत त्यांनी उत्पादनाचा दर्जा वाढवला आहे.
advertisement
6/7
अशी केली मशागत : सुरुवातीला शेतीची उभी-आडवी नांगरट केली. एकरी 6 टेलर शेणखत घातले. यानंतर रान कुरटले, दोनवेळा रोटर मारून रान भुसभुशीत करून घेतले. यावर पाच फुटी गादी वाफा सरी सोडली.
advertisement
7/7
5 फूट अंतरावर एक रोप दोन ओळीतील अंतर 5फूट ठेवून झिगझॅग पध्दतीने रोपांची लावण केली. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार केळीला वेळच्या-वेळी फवारण्या आणि खतांचे डोस दिले. केळी पीक अतिशय लाभदायक असून शेतकऱ्यांनी या पिकाकडे वळले पाहिजे असे थोरात बंधूंनी सांगितले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/कृषी/
Banana Farming : सांगलीच्या थोरात बंधूंची कमाल, केळी लागवडीतून वर्षाला घेतायत 60 लाखांचं उत्पन्न, अशी करतात शेती