वर्षाच्या अखेरीसही शेतकरी संकटातच, नाशिकमध्ये 172 हेक्टर पिक गेलं पाण्यात
- Published by:Mohan Najan
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
Last Updated:
वर्षांच्या अखेरीसही शेतकरी संकटात सापडला आहे. नाशिकमध्ये झालेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्यात 172 हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे.
advertisement
1/7

हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार गेल्या दोन दिवसापूर्वी नाशिकमध्ये अवकाळी पाऊस झाला. अवकाळी पावसाने जिल्ह्यात 172 हेक्टर पिकांचे नुकसान झाले असून दिंडोरी, येवल्यासह नाशिक तालुक्याला मोठा फटका बसला आहे.
advertisement
2/7
एकूण 23 गावांतील 301 शेतकरी या अवकाळीमुळे प्रभावित झाले आहेत. द्राक्ष, गव्हासह कांदा पिकाचे देखील नुकसान झाले आहे. महिनाभरात सुमारे 500 हेक्टरचे नुकसान झाल्याची नोंद प्रशासनाकडे करण्यात आली असल्याची माहिती कृषी उपसंचालक जगदीश पाटील यांनी लोकल 18 शी बोलताना दिली.
advertisement
3/7
त्याचप्रमाणे गेल्या आठवल्यात झालेल्या पावसामुळे शेतीपिके आणि फळपिकांच्या नुकसानीचा प्राथमिक अंदाज प्राप्त झाला आहे. गारपिटीसह जोरदार पावसाचा अंदाज वर्तविला असला तरी जिल्ह्यातील काही तालुक्यांत थोड्या वेळेसाठी पाऊस झाला होता.
advertisement
4/7
दिंडोरी तालुक्यात 76 हेक्टर आणि नाशिक तालुक्यात 20 हेक्टरवरील द्राक्षबागा असे जिल्ह्यात एकूण 96 हेक्टरवरील द्राक्षबागांचे नुकसान झाले. येवला तालुक्यात 47 हेक्टर गव्हाच्या पिकाची, तर 29 हेक्टर कांदाच्या पिकाचे असे एकूण 76 हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे.
advertisement
5/7
डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीस झालेल्या पावसामुळे दिंडोरी, नाशिक आणि निफाड या तीन तालुक्यांमधील 398 हेक्टरवरील पिकांना फटका बसला होता. त्यात 211. 30 हेक्टर वर द्राक्षाचे नुकसान झाले. या अवकाळी पावसाचा फटका 4 तालुक्यांमधील 63 गावांना बसला. नुकसानग्रस्त सर्वाधिक 36 गावे नाशिक तालुक्यातील होते.
advertisement
6/7
त्यात पुन्हा शुक्रवारी झालेल्या अवकाळीने भर घातली. दिंडोरी तालुक्यातील 12 आणि निफाड तालुक्यातील 4 गावांमधील तसेच सिन्नर तालुक्यातील 4 गावांमधील पिकांचे मोठे नुकसान केले आहे. येवल्यातील पिकांनाही त्याचा मोठा फटका बसला असल्याचे जगदीश पाटील यांनी सांगितले.
advertisement
7/7
सर्वाधिक नुकसान द्राक्षबागांचे : दिडोरी तालुक्यातीत 128.20 हेक्टरवरील दाक्षबागांना अवकाळीचा फटका बसला आहे. नाशिक तालुक्यातील 93 हेक्टर क्षेत्रावरील द्राक्ष बाग पाण्यामुळे झोपल्या आहेत. दिंडोरीत एकूण 120.80 हेक्टरवरील पिकांचे, तर नाशिकमध्ये एकूण 288 हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे. निफाड आणि सिन्नरमध्ये प्रत्येकी 1.50 हेक्टर क्षेत्रातील दाक्षबागांचे नुकसान झाले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/कृषी/
वर्षाच्या अखेरीसही शेतकरी संकटातच, नाशिकमध्ये 172 हेक्टर पिक गेलं पाण्यात