School Bus Accident: नंदुरबारमध्ये शाळेची बस 150 फूट दरीत कोसळली, एका विद्यार्थ्यांचा मृत्यू, अनेक जखमी; मन सुन्न करणारे फोटो
- Published by:Prachi Amale
Last Updated:
School Bus Accident: अपघातग्रस्त बसमध्ये एकूण २० ते ३० विद्यार्थी असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनास्थळी पालकांचा आक्रोश मन सुन्न करणारा आहे
advertisement
1/8

अक्कलकुवा तालुक्यातील देवगोई घाट परिसरात झालेल्या भीषण अपघात झाला आहे. विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी एक स्कूल बस अंदाजे शंभर ते दीडशे फूट खोल दरीत कोसळली.
advertisement
2/8
या दुर्घटनेत एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असून अनेक विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. खोल दरीत कोसळलेल्या बसमध्ये दबल्याने विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे.
advertisement
3/8
मोलगी गावातील विद्यार्थी रोजप्रमाणे बसने अक्कलकुवाकडे निघाले होते. देवगोई घाटातील आमलिबारी परिसरात पोहोचली असता चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. काही क्षणांतच बस खोल दरीत कोसळली.
advertisement
4/8
अपघात इतका भीषण होता की बसचा चक्काचूर झाला असून काही विद्यार्थी बसखाली दबल्याचे प्राथमिक वृत्त आहे.
advertisement
5/8
स्थानिक ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. ग्रामीण पोलीस व अग्निशामक दलालाही तातडीने माहिती देण्यात आली.
advertisement
6/8
स्थानिकांच्या मदतीने जखमींना बाहेर काढून अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.
advertisement
7/8
अपघातग्रस्त बसमध्ये एकूण २० ते ३० विद्यार्थी असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनास्थळी पालकांचा आक्रोश सुरू आहे.
advertisement
8/8
अक्कलकुवा परिसरात या अपघातामुळे एकच खळबळ उडाली असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
School Bus Accident: नंदुरबारमध्ये शाळेची बस 150 फूट दरीत कोसळली, एका विद्यार्थ्यांचा मृत्यू, अनेक जखमी; मन सुन्न करणारे फोटो