'असा नवरा पुन्हा नको...', गोविंदाबद्दल पुन्हा बरळली सुनीता आहुजा, वैतागून केला शॉकिंग खुलासा, म्हणाली...
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Govinda Sunita Ahuja relationship : नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सुनीता आहुजा यांनी गोविंदाबद्दल खूपच धक्कादायक खुलासा केला आहे.
advertisement
1/8

मुंबई: बॉलिवूड अभिनेता गोविंदा याची पत्नी सुनीता आहुजा त्यांच्या स्पष्ट आणि बेधडक वक्तव्यांसाठी ओळखल्या जातात. गोविंदासोबतच्या नात्यातील ताण आणि अडचणींवर त्या नेहमीच खुलेपणाने बोलतात. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सुनीता आहुजा यांनी केलेला खुलासा खूपच धक्कादायक आहे.
advertisement
2/8
त्यांनी थेट सांगितले आहे की, पुढच्या कोणत्याही जन्मी त्यांना गोविंदासारखा पती नको आहे. गोविंदा एक चांगला मुलगा आणि भाऊ असेल, पण तो कधीही चांगला पती नव्हता, असे त्यांचे म्हणणे आहे.
advertisement
3/8
पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत सुनीता आहुजा यांनी आपल्या खासगी आयुष्यातील वेदना उघड केल्या. गोविंदाने तारुण्याच्या काळात खूप चुका केल्या आणि त्यांनी त्याला प्रत्येक चुकीसाठी माफ केले, असे त्यांनी सांगितले.
advertisement
4/8
सुनीता आहुजा म्हणतात की, त्यांनीही आयुष्यात चुका केल्या असतील, पण गोविंदाने केलेल्या चुकांची संख्या खूप जास्त आहे. त्या स्पष्टपणे म्हणाल्या, "मी आज फक्त माझी मुलगी टीना आणि मुलगा यश यांच्यामुळेच जिवंत आहे." मुलांवर असलेल्या प्रचंड प्रेमामुळेच त्या आयुष्यात पुढे जाऊ शकल्याचे त्यांनी सांगितले.
advertisement
5/8
सुनीता आहुजा मुलांवर खूप प्रेम करतात आणि त्यांच्याबद्दल त्या खूप पझेसिव्ह आहेत. त्यांनी सांगितले की, लहानपणी जेव्हा त्या त्यांची मुलगी टीनाला विचारत असत की, ती कोणावर जास्त प्रेम करते? तेव्हा टीना नेहमी गोविंदाचे नाव घ्यायची, ज्यामुळे त्यांची खूप चिडचिड व्हायची.
advertisement
6/8
आता मुलगी टीना सुनीता यांच्यावर खूप प्रेम करते आणि त्यांना नेहमी पाठिंबा देते. सुनीता आहुजा यांनी सांगितले की, त्यांची मुले सोडून त्यांचे आयुष्यात कोणतेही मित्र नाहीत. त्यांना मैत्रीसारख्या नात्यांवर फारसा विश्वास नाही आणि टीना व यश हेच त्यांचे सर्वात जवळचे मित्र आहेत.
advertisement
7/8
गोविंदासोबत सात जन्माचे बंधन पुन्हा निभावणार का, असे विचारले असता सुनीता आहुजा यांनी हात जोडले आणि स्पष्ट नकार दिला. त्या म्हणाल्या, "नाही! मला गोविंदासारखा नवरा पुन्हा नको. तो एक चांगला मुलगा आहे, तो एक चांगला भाऊ आहे, पण तो कधीच एक चांगला पती नव्हता."
advertisement
8/8
या विधानांवरून गोविंदा आणि सुनीता यांच्या वैवाहिक आयुष्यात आजही बऱ्याच अडचणी आणि तणाव असल्याचे स्पष्ट होते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'असा नवरा पुन्हा नको...', गोविंदाबद्दल पुन्हा बरळली सुनीता आहुजा, वैतागून केला शॉकिंग खुलासा, म्हणाली...