TRENDING:

खूप कष्ट केले, हाल सोसले! १४ नोव्हेंबरपासून मंगळ शनीचा त्रिदशांक योग, 'या' राशींना करणार मालामाल

Last Updated:
Astrology News : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या हालचालींचा परिणाम मानवाच्या जीवनावर खोलवर होत असतो. पंचांगानुसार, १४ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजून ५९ मिनिटांनी मंगळ आणि शनी हे एकमेकांपासून १०८ अंशांच्या कोणीय अंतरावर येणार आहेत.
advertisement
1/5
१४ नोव्हेंबरपासून मंगळ शनीचा त्रिदशांक योग, 'या' राशींना करणार मालामाल
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या हालचालींचा परिणाम मानवाच्या जीवनावर खोलवर होत असतो. पंचांगानुसार, १४ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजून ५९ मिनिटांनी मंगळ आणि शनी हे एकमेकांपासून १०८ अंशांच्या कोणीय अंतरावर येणार आहेत. या विशेष ग्रहस्थितीमुळे "त्रिदशांक योग" निर्माण होईल. जोपर्यंत मंगळ धनु राशीत आणि शनी मीन राशीत राहतील, तोपर्यंत हा शुभ योग प्रभावी राहील. या योगाचा परिणाम सर्व राशींवर होणार असला, तरी काही राशींसाठी हा काळ अत्यंत भाग्यवर्धक ठरणार आहे. विशेषतः वृषभ, कन्या, मकर आणि मीन राशीच्या व्यक्तींचे नशीब या काळात उजळून निघणार आहे.
advertisement
2/5
वृषभ राशी - वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी त्रिदशांक योग अतिशय शुभ आणि प्रगतीकारक ठरेल. दीर्घकाळ मनात असलेल्या इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील. आर्थिकदृष्ट्या मजबुती येईल, तसेच घरात सुख-समृद्धी वाढेल. या काळात नव्या वस्तू खरेदी करण्याचा आनंद मिळेल. नोकरीत प्रमोशन किंवा पगारवाढ होण्याची शक्यता आहे. मुलांकडून आनंदाची बातमी मिळेल आणि कौटुंबिक जीवन आनंदी राहील. स्पर्धा परीक्षांत यश मिळण्याची शक्यता आहे. वरिष्ठ अधिकारी तुमच्या मेहनतीची दखल घेतील आणि करिअरमध्ये चांगली प्रगती होईल.
advertisement
3/5
कन्या राशी -  कन्या राशीच्या व्यक्तींनाही या योगाचा मोठा फायदा होणार आहे. अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक स्थैर्य राहील आणि कुटुंबात उत्साहाचे वातावरण निर्माण होईल. वैवाहिक जीवनात सौहार्द वाढेल, तसेच नव्या वस्तू खरेदी करण्याचा आनंद लाभेल. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांचे सहकार्य आणि कौतुक मिळेल. नवीन नोकरी शोधणाऱ्यांना इच्छित संधी मिळण्याची शक्यता आहे. या काळात आत्मविश्वास वाढेल आणि निर्णयक्षमता सुधारेल.
advertisement
4/5
मकर राशी - मकर राशीच्या व्यक्तींसाठी त्रिदशांक योग विशेष लाभदायी ठरेल. आकस्मिक धनलाभ होऊ शकतो. घरातील वातावरण आनंदी राहील आणि प्रत्येक कामात कुटुंबीयांची साथ लाभेल. भाग्याची साथ मिळाल्याने नवे मार्ग खुलतील. या काळात तीर्थयात्रा किंवा दूरचे प्रवास घडतील. नोकरी करणाऱ्यांच्या पगारात वाढ होईल आणि अडकलेले पैसे परत मिळतील. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील, मित्रांसोबत आनंदाचे क्षण व्यतीत होतील. आरोग्य उत्तम राहील आणि मानसिक स्थैर्य वाढेल.
advertisement
5/5
मीन राशी -  मीन राशीच्या व्यक्तींना त्रिदशांक योग आर्थिकदृष्ट्या मोठा लाभ देणारा ठरेल. मंगळ-बुधाच्या अनुकूलतेमुळे या राशीच्या लोकांना जीवनात सकारात्मक बदल जाणवतील. बँक बॅलन्स वाढेल, प्रतिष्ठा आणि मान-सन्मान मिळेल. व्यावसायिक क्षेत्रात प्रगतीची नवी दारे उघडतील. समाजात तुमच्या कार्याचे कौतुक होईल. स्पर्धा परीक्षांमध्ये किंवा करिअरच्या क्षेत्रात अपेक्षित यश मिळेल. धार्मिक कार्यांकडे ओढ निर्माण होईल आणि अध्यात्मिक प्रगती साध्य होईल. वैवाहिक जीवनात समरसता आणि आनंद वाढेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
खूप कष्ट केले, हाल सोसले! १४ नोव्हेंबरपासून मंगळ शनीचा त्रिदशांक योग, 'या' राशींना करणार मालामाल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल