TRENDING:

दिवाळीत ५ राशींवर होणार मोठा धनवर्षाव! निरोगी आयुष्यासह पुण्य लाभणार

Last Updated:
Astrology News : हिंदू धर्मानुसार आनंद, उत्साह आणि प्रकाशाचा प्रतीक असलेला दिवाळीचा सण आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे.
advertisement
1/7
दिवाळीत ५ राशींवर होणार मोठा धनवर्षाव! निरोगी आयुष्यासह पुण्य लाभणार
हिंदू धर्मानुसार आनंद, उत्साह आणि प्रकाशाचा प्रतीक असलेला दिवाळीचा सण आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. यंदा दिवाळीचा प्रारंभ १८ ऑक्टोबरपासून होत असून, २३ ऑक्टोबरला भाऊबीज या उत्सवाने या आनंदमयी सणाचा समारोप होणार आहे. या काळात संपूर्ण देशभरात पूजा, सजावट, फटाक्यांचा आवाज आणि आनंदाचे वातावरण पसरलेले असेल.
advertisement
2/7
ज्योतिषशास्त्रानुसार, या वर्षीची दिवाळी काही राशींसाठी अत्यंत शुभ काळ घेऊन येत आहे. या काळात लक्ष्मी नारायण राजयोग, धनलाभ योग आणि अनेक दुर्मिळ ग्रहसंयोग निर्माण होत आहेत, ज्यामुळे काही भाग्यवान राशींचे नशीब खुलणार आहे. चला, पाहूया कोणत्या राशींसाठी हा दिवाळीचा काळ विशेष ठरणार आहे.
advertisement
3/7
तूळ राशी -  तूळ राशीच्या जातकांसाठी २०२५ ची दिवाळी खास ठरणार आहे. या काळात देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहणार असून, करिअरमध्ये मोठी प्रगती होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांची साथ आणि नवीन संधी मिळू शकतात. या काळात नवीन कौशल्ये शिकण्याची इच्छा निर्माण होईल आणि अचानक धनलाभ होण्याचेही योग आहेत.
advertisement
4/7
धनु राशी -   धनु राशीच्या लोकांसाठी गुरु ग्रहाचे संक्रमण अत्यंत लाभदायी ठरणार आहे. आर्थिक तंगी दूर होईल आणि पैशांच्या बाबतीत स्थैर्य मिळेल. प्रॉपर्टी खरेदी किंवा गुंतवणुकीसाठी हा काळ अनुकूल आहे. व्यवसायात नवीन करार किंवा संधी मिळू शकतात. या काळात केलेले निर्णय भविष्यात लाभदायी ठरतील.
advertisement
5/7
कुंभ राशी -   कुंभ राशीच्या व्यक्तींना या दिवाळीत भाग्याचा साथ मिळणार आहे. शेअर मार्केट, ट्रेडिंग किंवा आर्थिक गुंतवणूक यामध्ये यश मिळू शकते. सामाजिक स्तरावरही तुमचा मान वाढेल. अचानक मिळालेल्या संधींचा फायदा घ्या, कारण या काळात ग्रहस्थिती तुमच्या बाजूने आहे.
advertisement
6/7
वृषभ राशी -  वृषभ राशीच्या जातकांसाठी शुक्र ग्रहाचा प्रभाव शुभकारक राहणार आहे. अनेक दिवसांपासून अडकलेले आर्थिक व्यवहार सुटतील. कुटुंबात समाधान आणि आनंदाचे वातावरण निर्माण होईल. या काळात व्यवसायात किंवा नोकरीत धनलाभ आणि प्रतिष्ठा वाढ होण्याचे संकेत आहेत.
advertisement
7/7
मिथुन राशी -   मिथुन राशीच्या लोकांसाठी दिवाळीचा काळ सुख-समृद्धीचा ठरणार आहे. आर्थिक क्षेत्रात वाढ होईल आणि नव्या उत्पन्नाच्या संधी निर्माण होतील. करिअरमध्ये बढती, सन्मान किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायिकांना नवीन भागीदारीतून फायदा होईल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
दिवाळीत ५ राशींवर होणार मोठा धनवर्षाव! निरोगी आयुष्यासह पुण्य लाभणार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल