TRENDING:

आजपासून आदित्य मंगल योग! 21 डिसेंबरपर्यंत या राशी होणार मालामाल

Last Updated:
Astrology News : : डिसेंबर 2025 चा तिसरा आठवडा म्हणजेच 15 ते 21 डिसेंबर हा कालावधी ज्योतिषीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
advertisement
1/6
आजपासून आदित्य मंगल योग! 21 डिसेंबरपर्यंत या राशी होणार मालामाल
डिसेंबर 2025 चा तिसरा आठवडा म्हणजेच 15 ते 21 डिसेंबर हा कालावधी ज्योतिषीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. या आठवड्यात ग्रहांच्या हालचालींमुळे अनेक शुभ संयोग घडून येत असून, त्याचा थेट परिणाम सर्व राशींवर होणार आहे. विशेष म्हणजे सूर्य आणि मंगळ यांच्या संयोगातून तयार होणारा आदित्य-मंगल योग या काळात प्रभावी ठरणार आहे. हा योग साहस, आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि यशाचे संकेत देणारा मानला जातो. त्यामुळे या आठवड्यात पाच राशींसाठी भाग्याची दारे खुली होण्याची शक्यता ज्योतिषतज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे. करिअर, आर्थिक गुंतवणूक, नातेसंबंध आणि सामाजिक प्रतिष्ठा या सर्व बाबींमध्ये सकारात्मक घडामोडी घडू शकतात.
advertisement
2/6
<strong>आदित्य-मंगल योगाचा प्रभाव -</strong> ज्योतिषशास्त्रानुसार, आठवड्याच्या सुरुवातीलाच सूर्य धनु राशीत प्रवेश करणार आहे. याच राशीत मंगळ आधीपासूनच स्थित असल्याने सूर्य-मंगळ युती तयार होईल. या संयोगामुळे आदित्य-मंगल योग अधिक बळकट होईल. हा योग विशेषतः धाडसी निर्णय, प्रशासनातील यश, आर्थिक लाभ आणि नेतृत्व क्षमता वाढवणारा ठरतो. या ग्रहयोगाचा लाभ पाच राशींना विशेष प्रमाणात मिळणार असून, त्यांच्या जीवनात प्रगतीचे नवे मार्ग खुले होतील.
advertisement
3/6
मेष - मेष राशीसाठी हा आठवडा अत्यंत अनुकूल ठरणार आहे. भाग्यस्थान सक्रिय झाल्यामुळे अनेक रखडलेली कामे मार्गी लागतील. नोकरीत वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल आणि सरकारी क्षेत्राशी संबंधित कामांत लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरी बदलण्याची इच्छा असलेल्यांना चांगली संधी मिळू शकते. आर्थिक बाबतीत स्थैर्य येईल, मात्र नातेसंबंधांत संयम राखणे गरजेचे ठरेल. मालमत्ता किंवा गुंतवणुकीतूनही फायदा संभवतो.
advertisement
4/6
मिथुन -मिथुन राशीच्या व्यक्तींमध्ये या आठवड्यात आत्मविश्वास वाढलेला दिसेल. नव्या कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. मित्र, सहकारी किंवा नातेवाईकांच्या मदतीने महत्त्वाचे यश मिळू शकते. व्यवसाय भागीदारी लाभदायक ठरेल. मात्र कौटुंबिक किंवा वैवाहिक नात्यांत संवादाचा अभाव टाळणे आवश्यक आहे. योग्य नियोजन केल्यास गुंतवणुकीतून नफा मिळू शकतो.
advertisement
5/6
सिंह - सिंह राशीसाठी हा आठवडा प्रगतीचा आणि सन्मानाचा ठरेल. कामाच्या ठिकाणी तुमची दखल घेतली जाईल आणि प्रतिष्ठा वाढेल. आर्थिक लाभाचे संकेत आहेत. मुलांकडून आनंददायी बातमी मिळू शकते. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील आणि वैयक्तिक आयुष्यात समाधान मिळेल.
advertisement
6/6
कन्या - कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ सुखसोयी वाढवणारा ठरणार आहे. शिक्षण, पर्यटन, सेवा किंवा व्यवसाय क्षेत्रात सकारात्मक परिणाम दिसतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात अधिक एकाग्रता लाभेल. उत्पन्न वाढण्याची शक्यता असून, दीर्घकालीन योजनांना गती मिळेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
आजपासून आदित्य मंगल योग! 21 डिसेंबरपर्यंत या राशी होणार मालामाल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल