कष्ट संपले, प्रगतीचा मार्ग मोकळा झाला, पुढचे 6 महीने या राशींकडे सुख शांतीसह अफाट पैसा येणार
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Astrology News : नववर्ष 2026 ची सुरुवात होताच वर्षातील पहिला सण मकर संक्रांत 14 जानेवारी रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. याच दिवशी सूर्याने मकर राशीत प्रवेश केल्याने सूर्याचे उत्तरायण सुरू झाले आहे.
advertisement
1/7

नववर्ष 2026 ची सुरुवात होताच वर्षातील पहिला सण मकर संक्रांत 14 जानेवारी रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. याच दिवशी सूर्याने मकर राशीत प्रवेश केल्याने सूर्याचे उत्तरायण सुरू झाले आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, उत्तरायण हा काळ अत्यंत शुभ मानला जातो. सूर्य हा ग्रहांचा राजा असल्याने त्याच्या या संक्रमणाचा प्रभाव सर्व राशींवर जाणवतो. विशेष म्हणजे पुढील सहा महिने काही राशींसाठी भाग्यवर्धक ठरणार असून धन, यश, प्रतिष्ठा आणि प्रगतीचे नवे मार्ग खुल्या होणार असल्याचे ज्योतिषी सांगतात.
advertisement
2/7
ज्योतिषशास्त्रात सूर्याचा उत्तरायण काळ देवांचा काळ मानला जातो. या टप्प्यात सकारात्मक ऊर्जा वाढते, जीवनात स्थैर्य येते आणि अनेक रखडलेली कामे मार्गी लागतात, अशी मान्यता आहे. सूर्य 16 जुलै 2026 पर्यंत उत्तरायणात राहणार असून त्यानंतर कर्क राशीत प्रवेश केल्यावर दक्षिणायन सुरू होईल. मात्र या सहा महिन्यांच्या कालावधीत चार राशींवर सूर्याची विशेष कृपा राहणार आहे. या राशींना आर्थिक समृद्धी, करिअरमध्ये प्रगती आणि वैयक्तिक आयुष्यात आनंद मिळण्याची शक्यता आहे.
advertisement
3/7
वृषभ राशी - सूर्याचे उत्तरायण वृषभ राशीच्या लोकांसाठी अतिशय लाभदायक ठरणार आहे. आर्थिक बाजू मजबूत होईल आणि उत्पन्नाचे नवे स्रोत खुले होतील. वडिलोपार्जित मालमत्तेतून लाभ मिळण्याची शक्यता आहे. घरातील सुखसोयी वाढतील. नोकरी किंवा व्यवसायात प्रगतीचे संकेत असून वरिष्ठांकडून प्रशंसा मिळू शकते. वैयक्तिक आयुष्यात समाधान आणि स्थैर्य अनुभवता येईल.
advertisement
4/7
कर्क राशी - कर्क राशीच्या लोकांसाठी हा काळ करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढतील, पण त्याचबरोबर यशही मिळेल. आत्मविश्वासात वाढ होईल. आर्थिक लाभाचे अनेक मार्ग उपलब्ध होतील. कुटुंबातील नातेसंबंध अधिक घट्ट होतील आणि मानसिक तणावात घट होईल.
advertisement
5/7
तूळ राशी - तूळ राशीच्या लोकांसाठी सूर्य उत्तरायण काळ मोठी इच्छा पूर्ण करणारा ठरू शकतो. नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगली संधी मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात विस्ताराचे योग आहेत. रखडलेली कामे मार्गी लागतील. आरोग्याच्या दृष्टीनेही हा काळ अनुकूल असून जुन्या आजारांपासून दिलासा मिळू शकतो.
advertisement
6/7
मीन राशी - मीन राशीच्या लोकांसाठी पुढील सहा महिने आर्थिक सुधारणा घेऊन येणारे ठरणार आहेत. उत्पन्न वाढण्याचे संकेत आहेत. एखाद्या महत्त्वाच्या प्रकल्पाची सुरुवात होऊ शकते. वैवाहिक आणि कौटुंबिक जीवनात सुसंवाद राहील. आरोग्य चांगले राहण्याची शक्यता असून मानसिक शांतता लाभेल.
advertisement
7/7
<strong>(सदर बातमी फक्त महितीकरिता असून न्यूज १८ मराठी कुठलाही दावा करत नाही) </strong>
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
कष्ट संपले, प्रगतीचा मार्ग मोकळा झाला, पुढचे 6 महीने या राशींकडे सुख शांतीसह अफाट पैसा येणार