थोडा संयम बाळगा! नवरात्रीतील 2 राजयोग या राशींचे नशीब बदलणार, बँक बॅलेंस दुप्पट होणार
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Mahalakshmi Rajyog 2025 : गणेशोत्सवाचा गजर ओसरताच देशभरात नवरात्रीच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू झाली आहे. देवीच्या आगमनासाठी मंदिरांपासून ते घराघरात सजावट, पूजासाहित्य खरेदी आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची लगबग दिसत आहे.
advertisement
1/6

गणेशोत्सवाचा गजर ओसरताच देशभरात नवरात्रीच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू झाली आहे. 22 सप्टेंबरपासून नवरात्रीला सुरवात होणार आहे. देवीच्या आगमनासाठी मंदिरांपासून ते घराघरात सजावट, पूजासाहित्य खरेदी आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची लगबग दिसत आहे. विशेष म्हणजे, यंदाची शारदीय नवरात्र केवळ धार्मिकच नाही तर ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातूनही अत्यंत खास ठरणार आहे. कारण पंचांगानुसार या वर्षी नवरात्र नऊ नव्हे तर दहा दिवसांची असून, या काळात निर्माण होणारे ग्रहयोग अनेक राशींच्या भाग्यात मोठा बदल घडवू शकतात.
advertisement
2/6
नवरात्राच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच 24 सप्टेंबरला एक प्रभावी ग्रहसंयोग होणार आहे. या दिवशी चंद्र तूळ राशीत प्रवेश करेल, जिथे आधीच मंगळ विराजमान असेल. चंद्र हा धन आणि सौभाग्याचा कारक मानला जातो, तर मंगळ धैर्य आणि ऊर्जा देतो. या दोन ग्रहांच्या संयोगामुळे महालक्ष्मी राजयोग तयार होतो. हा योग समृद्धी, यश आणि आर्थिक प्रगतीसाठी शुभ मानला जातो.
advertisement
3/6
तूळ रास - तुमच्या राशीतच हा योग निर्माण होत असल्याने तुम्हाला थेट लाभ होईल. अडकलेली रक्कम परत मिळेल, व्यवसायात मोठे करार होतील. नोकरीत बढती किंवा पगारवाढीची शक्यता आहे. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.
advertisement
4/6
मकर रास - या राशीतील व्यक्तींना करिअरमध्ये प्रगतीची नवी दारे खुली होतील. वरिष्ठांचा विश्वास संपादन कराल. नवीन गुंतवणूक फायदेशीर ठरेल. केलेल्या मेहनतीचे फळ अपेक्षेपेक्षा जास्त मिळेल.
advertisement
5/6
कुंभ रास - या राशीसाठी महालक्ष्मी योग भाग्यवृद्धीकारक ठरणार आहे. परदेश प्रवासाच्या संधी मिळतील, दीर्घकाळ प्रलंबित कामे पूर्ण होतील. आत्मविश्वासात भर पडेल आणि मोठी आव्हाने सहज पार पडतील.
advertisement
6/6
<strong>(सदर बातमी फक्त माहितीकरिता असून न्यूज 18 मराठी कुठलाही दावा करत नाही)</strong>
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
थोडा संयम बाळगा! नवरात्रीतील 2 राजयोग या राशींचे नशीब बदलणार, बँक बॅलेंस दुप्पट होणार