TRENDING:

आज दिवसभरात या राशींना मिळणार गुड न्यूज! राहू ग्रहाचं संक्रमण, नवीन संधीसह हाती पैसा येणार

Last Updated:
Astrology News : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार 23 नोव्हेंबर हा दिवस वर्षातील अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. या दिवशी राहू ग्रहाचे संक्रमण होणार असून अनेक छोटे–मोठे ग्रह देखील राशी परिवर्तन करतील.
advertisement
1/6
राहू ग्रहाचं संक्रमण, आज दिवसभरात या राशींना मिळणार गुड न्यूज!
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार 23 नोव्हेंबर हा दिवस वर्षातील अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. या दिवशी राहू ग्रहाचे संक्रमण होणार असून अनेक छोटे–मोठे ग्रह देखील राशी परिवर्तन करतील. ग्रहांची ही मोठी चाल काही राशींसाठी नवी संधी, प्रगती आणि सकारात्मक उर्जेचा कालावधी घेऊन येणार आहे. तर काहींना या काळात सतर्क राहून निर्णय घ्यावा लागणार आहे. आज कोणत्या राशींवर सर्वाधिक शुभ परिणाम होणार आहेत, ते जाणून घेऊयात.
advertisement
2/6
मेष राशी - मेष राशीच्या लोकांसाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जात आहे. सकाळपासूनच आनंदी आणि सकारात्मक वातावरण जाणवेल. कामधंद्यात नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. ज्या गोष्टींसाठी तुम्ही खूप दिवसांपासून प्रयत्न करत होता, त्यात आज प्रगती होऊ शकते. आर्थिक लाभाचे संकेत आहेत, पण पैसे विनाकारण खर्च करण्याचे टाळा. जबाबदारीने वागणं गरजेचं आहे. मोठे निर्णय व नवीन योजनांची सुरुवात करण्यासाठी हा दिवस अनुकूल आहे.
advertisement
3/6
मिथुन राशी - मिथुन राशीसाठी 23 नोव्हेंबर ऊर्जा आणि उत्साह घेऊन आलेला आहे. मन प्रसन्न राहील व आत्मविश्वास वाढेल. मेहनतीला योग्य फळ मिळेल आणि यशाची नवी दारे उघडतील. नोकरी किंवा व्यवसायात प्रगती मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक स्तर पूर्वीपेक्षा सुधारेल. कार्यस्थळावर सहकाऱ्यांचा मजबूत पाठिंबा मिळेल ज्यामुळे मोठी कामे सहज पूर्ण होतील. करिअरमध्ये नवीन संधीचा लाभ घ्या.
advertisement
4/6
सिंह राशी - सिंह राशीच्या व्यक्तींसाठी हा दिवस योजनांच्या पूर्ततेचा आहे. कामानिमित्त प्रवास करावा लागू शकतो, पण हा प्रवास लाभदायक आणि करिअर वाढीसाठी महत्त्वाचा ठरेल. उत्पन्नाचे नवे मार्ग खुलतील व महत्त्वाच्या लोकांशी संपर्क साधण्याची संधी मिळेल. कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनात आनंद व सौहार्द राहील. मित्र व सहकाऱ्यांच्या मदतीने तुमची अनेक कामे सुलभ होतील. सिंह राशीच्या व्यक्तींसाठी हा दिवस योजनांच्या पूर्ततेचा आहे. कामानिमित्त प्रवास करावा लागू शकतो, पण हा प्रवास लाभदायक आणि करिअर वाढीसाठी महत्त्वाचा ठरेल. उत्पन्नाचे नवे मार्ग खुलतील व महत्त्वाच्या लोकांशी संपर्क साधण्याची संधी मिळेल. कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनात आनंद व सौहार्द राहील. मित्र व सहकाऱ्यांच्या मदतीने तुमची अनेक कामे सुलभ होतील.
advertisement
5/6
तूळ राशी - तूळ राशीसाठी 23 नोव्हेंबर भाग्याची साथ घेऊन येत आहे. नोकरीतील लोकांना प्रमोशन, वेतनवाढ किंवा चांगल्या पदाची संधी मिळू शकते. व्यवसायिकांना नवीन ग्राहक, ऑर्डर किंवा गुंतवणुकीची शक्यता आहे. आर्थिक स्त्रोत वाढतील. लांबकाळापासून प्रलंबित कामे पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा होईल. कामाच्या ठिकाणी मान-सन्मान आणि सहकाऱ्यांचा पाठिंबा मिळेल.
advertisement
6/6
कुंभ राशी - कुंभ राशीच्या लोकांसाठी हा दिवस मोठ्या जबाबदाऱ्यांसह संधीही घेऊन येणारा आहे. कामाच्या क्षेत्रात नवीन भूमिका किंवा प्रकल्प तुमच्याकडे सोपवला जाऊ शकतो. त्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे व दक्षतेने पूर्ण करणे महत्त्वाचे आहे. निर्णय घेताना घाई न करता विचारपूर्वक पावले उचलल्यास भविष्यात मोठा फायदा मिळेल. मित्र व सहकर्मी तुमच्या मदतीला राहतील, त्यामुळे टीमवर्कला प्राधान्य द्या.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
आज दिवसभरात या राशींना मिळणार गुड न्यूज! राहू ग्रहाचं संक्रमण, नवीन संधीसह हाती पैसा येणार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल