TRENDING:

शंभर दिवसांचा थरार, नशिबाचा जुगार; बिग बॉस मराठी 6 मध्ये 'हे' 17 शिलेदार भिडणार; स्पर्धकांची संपूर्ण यादी!

Last Updated:
Bigg Boss Marathi 6: शंभर दिवसांच्या या वनवासात कोण टिकणार आणि कोणाचा गेम संपणार, हे ठरवण्यासाठी या १७ स्पर्धकांनी घरात पाऊल ठेवलं आहे. पाहा, यंदाच्या सीझनचे अधिकृत स्पर्धक.
advertisement
1/20
शंभर दिवसांचा थरार, नशिबाचा जुगार; बिग बॉस मराठी 6 मध्ये 'हे' 17 शिलेदार भिडणार
मुंबई: प्रतीक्षा संपली! महाराष्ट्राच्या घराघरांत आता फक्त एकाच आवाजाची गुंज ऐकू येणार आहे, ती म्हणजे 'बिग बॉस'ची! ११ जानेवारी २०२६ रोजी रात्री ८ वाजता मोठ्या दिमाखात 'बिग बॉस मराठी सीझन ६' चा भव्य प्रीमियर पार पडला.
advertisement
2/20
महेश मांजरेकरांनंतर ही धुरा आता रितेश देशमुख सांभाळत असून, पाचव्या पर्वाच्या तुफान यशानंतर हे सहावं पर्व अधिकच रंजक आणि लय भारी होणार असल्याचं दिसतंय.
advertisement
3/20
शंभर दिवसांच्या या वनवासात कोण टिकणार आणि कोणाचा गेम संपणार, हे ठरवण्यासाठी या १७ स्पर्धकांनी घरात पाऊल ठेवलं आहे. पाहा, यंदाच्या सीझनचे अधिकृत स्पर्धक:
advertisement
4/20
१. दीपाली सय्यद: मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध नृत्यांगना, अभिनेत्री आणि धडाडीची राजकारणी. 'जाऊ तिथे खाऊ' (२००६) पासून करिअर सुरू करणाऱ्या दीपाली यांनी अभिनयासोबतच निवडणुकीच्या मैदानातही नशीब आजमावलं आहे. त्यांचं स्पष्टवक्तेपण घरात नक्कीच ठिणगी टाकणार.
advertisement
5/20
२. सागर कारंडे: 'चला हवा येऊ द्या' फेम सागर कारंडेला ओळखत नाही असा मराठी माणूस नसेल! विनोदाचा बादशहा असलेला सागर आता रिल लाईफ सोडून रिअल लाईफमध्ये कसं वागतो, याकडे सर्वांचं लक्ष आहे.
advertisement
6/20
३. सचिन कुमावत: 'खानदेशचा किंग' म्हणून ओळखला जाणारा सचिन सोशल मीडिया स्टार आहे. आपल्या मातीतील अस्सल गाणी आणि गावरान रांगडा अंदाज घेऊन तो घरात शिरला आहे.
advertisement
7/20
४. सोनाली राऊत: हिंदी बिग बॉस ८ मध्ये राडा करणारी सोनाली आता मराठीत धमाका करायला आली आहे. ग्लॅमर, नखरा आणि आक्रमकता हे तिचं शस्त्र आहे. 'द एक्सपोज' चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्येही नाव कमावलंय.
advertisement
8/20
५. तन्वी कोल्ते: मिस गोवा आणि मिस रत्नागिरीचा किताब जिंकणारी तन्वी सौंदर्यासोबतच बुद्धीचा वापर कशी करते, हे पाहणं रंजक ठरेल. 'लक्ष्मी निवास' मालिकेत तिने महत्त्वाची भूमिका साकारली आहे.
advertisement
9/20
६. आयुष संजीव: कोरिओग्राफर ते अभिनेता असा प्रवास केलेला आयुष 'बॉस माझी लाडाची' सारख्या मालिकांतून घराघरांत पोहोचला आहे. त्याचा डान्स आणि चॉकलेट बॉय इमेज काय जादू करते, ते दिसेलच.
advertisement
10/20
७. करण सोनवणे: 'फोकस्ड इंडियन' म्हणून प्रसिद्ध असलेला करण हा डिजिटल जगाचा बादशहा आहे. थिएटरपासून सुरू झालेला त्याचा प्रवास आता मोठ्या पडद्यापर्यंत पोहोचला असून, तो घरातील हसवणारा चेहरा ठरू शकतो.
advertisement
11/20
८. प्रभू शेळके: "कोंबडीचा कापुरा खायगा" म्हणत सोशल मीडियावर व्हायरल झालेला प्रभू हा घरातील सर्वात तरुण स्पर्धक आहे. त्याच्या कोल्हापुरी रांगड्या स्वभावामुळे घरात करमणुकीची कमतरता भासणार नाही.
advertisement
12/20
९. प्राजक्ता शुक्रे: 'इंडियन आयडल' सीझन १ ची टॉप ५ फायनलिस्ट! सुरेल आवाजाची ही राणी घरात गाण्यासोबतच जुन्या वादग्रस्त आठवणींमुळेही चर्चेत राहण्याची शक्यता आहे.
advertisement
13/20
१०. रुचिता जामकर: रुचिताला रिअॅलिटी शोचा दांडगा अनुभव आहे. 'रोडीज' आणि 'मी होणार सुपरस्टार' गाजवल्यानंतर आता बिग बॉसच्या चक्रव्यूहात ती कशी टिकते, हे पाहणं महत्त्वाचं आहे.
advertisement
14/20
११. अनुश्री माने: 'शाळा' या वेबसीरीजमधील 'निलू' म्हणून लोकप्रिय झालेली अनुश्री एक उत्तम अभिनेत्री आणि कंटेंट क्रिएटर आहे. तिची निरागसता घराला एक वेगळी दिशा देईल.
advertisement
15/20
१२. राकेश बापट: बॉलिवूडचा हँडसम हंक! 'तुम बिन' फेम राकेशने याआधी हिंदी 'बिग बॉस ओटीटी'मध्ये आपली शांत आणि संयमी खेळी दाखवली आहे. त्याची आणि शमिता शेट्टीची केमिस्ट्री तेव्हा खूप गाजली होती.
advertisement
16/20
१३. रोशन भजनकर: अमरावतीचा हा देशी पैलवान रेल्वे यार्डात हमाली करतो. हमाली ते 'बिग बॉस' असा त्याचा प्रेरणादायी प्रवास असून, त्याची शारीरिक ताकद टास्कमध्ये कामाला येईल.
advertisement
17/20
१४. दिव्या शिंदे: 'सरकार सेना' या संघटनेची प्रमुख आणि आंबेडकरी चळवळीतील सक्रिय कार्यकर्ती. अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारी दिव्या घरात कोणाला भिडणार, याची उत्सुकता आहे.
advertisement
18/20
१५. राधा पाटील: प्रसिद्ध लावणी डान्सर! गौतमी पाटीलला तगडी टक्कर देणारी राधा आपल्या ठसकेबाज नृत्याने आणि मराठमोळ्या अंदाजाने घरात रंगत आणेल.
advertisement
19/20
१६. ओमकार राऊत: ओमकार हा एक प्रोफेशनल हेअर स्टायलिस्ट आणि इन्फ्लुएन्सर आहे. फॅशन आणि स्टाईलच्या बाबतीत तो घरातील इतर स्पर्धकांना नक्कीच मार्गदर्शन करेल.
advertisement
20/20
१७. विशाल कोटियन: हिंदी 'बिग बॉस १५' गाजवणारा विशाल आता मराठीत आपली 'बीरबल' बुद्धी वापरणार आहे. त्याला या खेळाचे सर्व बारकावे माहिती आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
शंभर दिवसांचा थरार, नशिबाचा जुगार; बिग बॉस मराठी 6 मध्ये 'हे' 17 शिलेदार भिडणार; स्पर्धकांची संपूर्ण यादी!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल