दिवाळीत तब्बल ५०० वर्षांनी येणार योग, शनी वक्री होणार, या राशींचे दारिद्रय जाणार, पाण्यासारखा पैसा मिळणार
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Shani Vakri 2025 : ज्योतिषशास्त्रात शनी हा सर्वात मंद गतीने भ्रमण करणारा ग्रह मानला जातो. ‘कर्मफळदाता’ म्हणून ओळखला जाणारा शनी ग्रह व्यक्तीच्या कर्मानुसार फळ देतो.
advertisement
1/5

ज्योतिषशास्त्रात शनी हा सर्वात मंद गतीने भ्रमण करणारा ग्रह मानला जातो. ‘कर्मफळदाता’ म्हणून ओळखला जाणारा शनी ग्रह व्यक्तीच्या कर्मानुसार फळ देतो. म्हणूनच शनीच्या हालचाली आणि त्याचा प्रत्येक राशीवर होणारा परिणाम याकडे ज्योतिषशास्त्रात विशेष लक्ष दिले जाते. अलीकडेच शनीने कुंभ राशीचा प्रवास संपवून मीन राशीत प्रवेश केला आहे आणि तो २०२७ पर्यंत मीन राशीतच विराजमान राहणार आहे. मात्र, या काळात त्याची स्थिती बदलत राहील.
advertisement
2/5
पंचांगानुसार, २० ऑक्टोबर २०२५ रोजी दिवाळीच्या दिवशी शनी वक्री होणार आहे. शनीची ही वक्री स्थिती काही राशींसाठी अत्यंत शुभ मानली जात असून, त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणू शकते. चला पाहूया कोणत्या तीन राशींना याचा सर्वाधिक लाभ होईल.
advertisement
3/5
<strong>मिथुन -</strong> मिथुन राशीच्या लोकांसाठी शनीची वक्री स्थिती भाग्यवर्धक ठरेल. या काळात मनातील अनेक इच्छा पूर्ण होऊ शकतात. आर्थिक लाभाच्या संधी वाढतील आणि अडथळ्यात अडकलेली कामे सुटू लागतील. कुटुंबासोबत आनंदाचे क्षण अनुभवता येतील. जोडीदारासह प्रवासाचे, विशेषतः लाँग ड्राईव्हचे, योग संभवतात. अचानक मिळणाऱ्या पैशामुळे आर्थिक स्थैर्य वाढेल. शत्रू किंवा विरोधक पराभूत होतील, तर गुंतवणुकीतूनही चांगला नफा मिळू शकतो. मात्र, वडिलांच्या आरोग्याची काळजी घेणे या काळात आवश्यक आहे.
advertisement
4/5
<strong>मकर -</strong> मकर राशीसाठी शनीची वक्री चाल अत्यंत अनुकूल आहे. या काळात आर्थिक लाभ मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो. कुटुंबीयांसोबत नाते दृढ होतील आणि समाधानाचा काळ अनुभवता येईल. नोकरी करणाऱ्यांना विशेषतः परदेशी कंपन्यांकडून चांगल्या संधी मिळू शकतात. परदेशात व्यवसाय करण्याचे किंवा विस्ताराचे योग आहेत, ज्यातून मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. वडिलोपार्जित मालमत्ता मिळण्याचा आनंदही मिळू शकतो. उत्पन्नात लक्षणीय वाढ होईल आणि मेहनतीचे फळ नक्कीच हातात येईल.
advertisement
5/5
<strong>कुंभ -</strong> कुंभ राशीच्या लोकांसाठी शनीची ही वक्री अवस्था मोठ्या प्रमाणात फायदेशीर ठरू शकते. परदेश प्रवासाचे योग निर्माण होतील. अध्यात्म व धार्मिक कार्यात रस वाढेल, ज्यामुळे धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल. या काळात नवीन लोकांशी परिचय होऊन समाजातील वर्तुळ वाढेल. दीर्घकाळ प्रलंबित असलेली कामे पुन्हा सुरू होतील आणि जीवन हळूहळू रुळावर येईल. साडेसातीचा त्रास कमी होण्याची शक्यता आहे. व्यवसायात थोडा धोका पत्करावा लागेल, परंतु त्या धोक्याचे फळ मात्र यशस्वी ठरू शकते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
दिवाळीत तब्बल ५०० वर्षांनी येणार योग, शनी वक्री होणार, या राशींचे दारिद्रय जाणार, पाण्यासारखा पैसा मिळणार