टेन्शन वाढलं! ११ नोव्हेंबरपासून पुढील २५ दिवस 'या' राशींसाठी मोठ्या संकटाचे, प्रचंड नुकसान होणार
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Astrology News : २०२५ मध्ये गुरू ग्रह कर्क राशीत भ्रमण करत आहे. आता ११ नोव्हेंबर २०२५ रोजी गुरू वक्री होणार आहे. या वक्री स्थितीचा परिणाम सर्व राशींवर वेगवेगळ्या प्रकारे दिसून येईल.
advertisement
1/5

२०२५ मध्ये गुरू ग्रह कर्क राशीत भ्रमण करत आहे. आता ११ नोव्हेंबर २०२५ रोजी गुरू वक्री होणार आहे. या वक्री स्थितीचा परिणाम सर्व राशींवर वेगवेगळ्या प्रकारे दिसून येईल. काहींसाठी हा काळ सुवर्णसंधी घेऊन येणारा असेल, तर काही राशींसाठी तो आव्हानात्मक आणि सावध राहण्यास भाग पाडणारा ठरू शकतो. गुरू वक्री गती ११ नोव्हेंबरपासून सुरू होऊन ५ डिसेंबर २०२५ पर्यंत चालणार आहे. त्यामुळे पुढील २५ दिवस सर्व राशींनी विशेष काळजी घ्यावी, असा सल्ला ज्योतिष तज्ज्ञांनी दिला आहे.
advertisement
2/5
गुरू हा ज्ञान, संपत्ती, नोकरी, आणि अध्यात्माचा कारक ग्रह मानला जातो. जेव्हा तो वक्री होतो, तेव्हा त्याच्या ऊर्जेचा प्रवाह उलटा होतो. त्यामुळे काही राशींना अडथळे, निर्णयांमध्ये गोंधळ, आर्थिक चढ-उतार आणि मानसिक ताण अनुभवायला मिळतो. ११ नोव्हेंबरपासून कर्क राशीत वक्री झालेला गुरू ५ डिसेंबरपर्यंत उलट दिशेने भ्रमण करेल. त्यानंतर तो मिथुन राशीत प्रवेश करेल आणि जून २०२६ पर्यंत तिथेच राहील. ११ मार्च २०२६ रोजी गुरू थेट मार्गी येईल. या सर्व बदलांचा परिणाम विशेषतः मिथुन, तूळ आणि कुंभ राशींवर जाणवेल.
advertisement
3/5
मिथुन - मिथुन राशीसाठी हा काळ आव्हानात्मक आहे. गुरूची वक्री गती तुमच्या कारकिर्दीवर आणि आर्थिक स्थितीवर दबाव आणू शकते. नोकरीतील जबाबदाऱ्या वाढतील, परंतु त्यानुसार यश मिळण्यात विलंब होईल. व्यवसाय करणाऱ्यांनी गुंतवणुकीचे निर्णय घेताना सावधगिरी बाळगावी. घरातील अचानक खर्च आणि आरोग्याशी संबंधित खर्च तुमचे बजेट बिघडवू शकतात. या काळात धैर्य आणि संयम राखणेच तुमच्यासाठी यशाची गुरुकिल्ली ठरेल.
advertisement
4/5
तूळ - तूळ राशीच्या लोकांनी या काळात आर्थिक आणि वैयक्तिक दोन्ही क्षेत्रात सावध राहणे गरजेचे आहे. कर्ज,व्यवहार किंवा मोठ्या गुंतवणुकींमध्ये उतरण्यापूर्वी नीट विचार करा.या काळात भूतकाळातील चुका समजून घेऊन त्यांचे आत्मपरीक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे. कार्यक्षेत्रात गैरसमज होऊ शकतात, त्यामुळे संवादात पारदर्शकता ठेवा. तणाव टाळण्यासाठी ध्यान, प्रार्थना किंवा प्रवासाचा अवलंब करा.
advertisement
5/5
कुंभ - कुंभ राशीसाठी हा काळ मानसिक आणि आर्थिक दोन्ही दृष्टिकोनातून थोडा कठीण आहे.अचानक खर्च वाढतील, तसेच नको त्या गोष्टींवर पैसे खर्च होऊ शकतात. काही जुने निर्णय तुमच्यासमोर आव्हानासारखे उभे राहतील. कुटुंबातील तणाव किंवा गैरसमज निर्माण होऊ शकतात, त्यामुळे संयम ठेवा. या काळात मंदिरात दर्शन,दानधर्म आणि देवाचे नाव स्मरण हे मानसिक स्थैर्य देऊ शकते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
टेन्शन वाढलं! ११ नोव्हेंबरपासून पुढील २५ दिवस 'या' राशींसाठी मोठ्या संकटाचे, प्रचंड नुकसान होणार