OTT : 100 वर्ष मागे घेऊन जातोय सिनेमा, 1 तास 56 मिनिटांचा मुव्ही; एकही डायलॉग नाही, तरी Netflix वर ट्रेंडिंग
- Published by:Minal Gurav
Last Updated:
OTT Movie : अभिनेते कमल हासन यांचा पुष्पक हा सिनेमा तुम्हाला आठवतोय का? तसाच एक सिनेमा OTT वर ट्रेंड करतोय. ज्यात एकही डायलॉग नाहीये. पण स्टोरी मात्र प्रेक्षकांची मनं जिंकतेय.
advertisement
1/7

अभिनेते कमल हासन यांचा पुष्पक हा सिनेमा तुम्हाला आठवतोय का? या सिनेमात एकही डायलॉग नव्हता पण सिनेमाच्या स्टोरी प्रेक्षकांची मनं जिंकून गेली. अशाच प्रकारचा एक सिनेमा सध्या नेटफ्लिक्सनर धुमाकूळ घालतोय. थ्रिलर कॉमेडी, मर्डर मिस्ट्री असलेला हा सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षक पसंती दर्शवत आहेत.
advertisement
2/7
1 तास 56 मिनिटांच्या या सिनेमाची स्टोरी इतकी सुंदर रचण्यात आली आहे की ती तुम्हाला विचार करायला भाग पाडते.
advertisement
3/7
1910च्या सुमारास जर कोणती फिल्म बनली असती तर ती अशीच असती. यात एकही डायलॉग नाही. फक्त कॅरेक्टर्स आणि बॅकग्राऊंड म्युझिकवर हा सिनेमा प्रेक्षकांचं मनोरंजन करतो.
advertisement
4/7
या सिनेमाचं नाव आहे 'उफ्फ ये स्यापा'. सोहम शाह, नुसरत भरूचा, नोरा फतेही आणि ओमकार कपूर हे कलाकार यात प्रमुख भूमिकेत आहेत. ही सायलेंट फिल्म असून नुकतीच नेटफ्लिकवर रिलीज झाली आहे.
advertisement
5/7
सिनेमात एकही डायलॉग नाहीये पण सिनेमाची स्ट्रोरी तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवते. या सिनेमाचं सध्या सर्वत्र कौतुक होतंय. नेटफ्लिकवरही सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळतोय. IMDbवर सिनेमाला 5.6 रेटिंग आहे.
advertisement
6/7
'उफ्फ ये स्यापा' ही एका छोट्या पार्सलची स्टोरी आहे जे चुकीच्या ठिकाणी पोहोचतं आणि त्यामुळे मोठं कांड घडतं. यात एक व्यक्ती आहे जो आपल्या शेजारणीवर लाइन मारतो पण घरात असलेल्या बायकोसमोर त्याचं काही एक चालत नाही.
advertisement
7/7
मग त्या व्यक्तीचा संपर्क दोन मृतदेहांशी होतो आणि तिथेच सिनेमाची स्टोरी पलटते. सोशल ड्रामा आणि कॉमेडीचा पुरेपुर डोस या सिनेमात तुम्हाला पाहायला मिळेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
OTT : 100 वर्ष मागे घेऊन जातोय सिनेमा, 1 तास 56 मिनिटांचा मुव्ही; एकही डायलॉग नाही, तरी Netflix वर ट्रेंडिंग