संघर्ष संपला! गुरुची वक्री चाल, ११ नोव्हेंबर ते ५ डिसेंबरपर्यंत या राशींचा राजयोग, जीवनात सुख समाधानासह पैसा येणार
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Astrology News : ज्योतिषशास्त्रानुसार 11 नोव्हेंबर 2025 पासून गुरु ग्रह कर्क राशीत वक्री गतीने प्रवास सुरू करणार आहे. कोणत्याही ग्रहाची वक्री चाल ही आत्मपरीक्षण, निर्णयांचा पुनर्विचार आणि भूतकाळातील गोष्टींचा आढावा घेण्याची उत्तम संधी मानली जाते.
advertisement
1/5

ज्योतिषशास्त्रानुसार 11 नोव्हेंबर 2025 पासून गुरु ग्रह कर्क राशीत वक्री गतीने प्रवास सुरू करणार आहे. कोणत्याही ग्रहाची वक्री चाल ही आत्मपरीक्षण, निर्णयांचा पुनर्विचार आणि भूतकाळातील गोष्टींचा आढावा घेण्याची उत्तम संधी मानली जाते. 11 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर 2025 या काळात गुरु कर्क राशीत वक्री राहील, आणि त्यानंतर तो मिथुन राशीत प्रवेश करून तिथेही काही काळ वक्री राहणार आहे. या काळात काही राशींवर गुरुच्या वक्री गतीचा अत्यंत सकारात्मक परिणाम होणार आहे.
advertisement
2/5
कन्या राशी - कन्या राशीच्या जातकांसाठी गुरुची वक्री चाल अत्यंत लाभदायक ठरेल. गुरु तुमच्या लाभभावात वक्री होत असल्यामुळे उत्पन्नाचे नवे मार्ग उघडतील. अडकलेली आर्थिक व्यवहार पुन्हा चालना मिळतील. नोकरीत बढती, पगारवाढ किंवा व्यवसायवृद्धीची शक्यता आहे. घर, वाहन किंवा स्थावर मालमत्तेचे सौख्य मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या प्रयत्नांना योग्य फळ मिळेल आणि समाजात प्रतिष्ठा वाढेल.
advertisement
3/5
वृश्चिक राशी - वृश्चिक राशीच्या जातकांसाठी हा काळ विशेष शुभ आहे. गुरु नशिबभावात वक्री होत असल्याने तुमच्या कार्यात नशिबाची साथ लाभेल. उच्च शिक्षण, परदेशगमन, धार्मिक कार्य किंवा नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी हा काळ योग्य आहे. नोकरी व व्यवसायात प्रगती होईल, नवीन संधी मिळतील. दीर्घकाळ प्रलंबित कामे पूर्ण होतील आणि आत्मविश्वास वाढेल.
advertisement
4/5
मीन राशी - गुरु वक्री काळ मीन राशीच्या व्यक्तींसाठी समाधान आणि स्थैर्य घेऊन येईल. आर्थिक स्थितीत लक्षणीय सुधारणा होईल. व्यवसायात स्थिरता आणि वाढ दिसून येईल. कौटुंबिक जीवनात आनंद वाढेल. मुलांकडून शुभवार्ता मिळण्याची शक्यता आहे. समाजात मान-सन्मान आणि कीर्ती वाढेल.
advertisement
5/5
मिथुन राशी - मिथुन राशीच्या जातकांसाठी गुरुची वक्री चाल अचानक धनलाभाचे संकेत देते. नोकरी आणि व्यवसायात प्रगती होईल, नवीन संधी मिळतील. समाजात प्रतिष्ठा आणि ओळख वाढेल. मित्रमंडळ आणि कुटुंबियांच्या सहकार्याने अडचणी दूर होतील. संबंधात समरसता निर्माण होईल आणि आत्मविश्वास दुणावेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
संघर्ष संपला! गुरुची वक्री चाल, ११ नोव्हेंबर ते ५ डिसेंबरपर्यंत या राशींचा राजयोग, जीवनात सुख समाधानासह पैसा येणार