TRENDING:

Aajache Rashibhavishya: यंदाची भाऊबीज खास, या राशींच्या नशिबी धनाची रास, तुमच्यासाठी दिवस कसा? आजचं राशीभविष्य

Last Updated:
Horoscope Today: यंदा दिवाळीतील भाऊबीजेचा दिवस खास असणार आहे. काही राशींना सुख-समृद्धीची भेट मिळेल. तुमच्या राशीला आजचा दिवस कसा आहे? हे आजचं राशीभविष्य जाणून घेऊ.
advertisement
1/13
यंदाची भाऊबीज खास, या राशींच्या नशिबी धनाची रास, आजचं राशीभविष्य
मेष राशी - नशिबावर हवाला ठेवून न राहता, आपलं आरोग्य सुधारण्याचा प्रयत्न करा. भविष्य ही एक आळसावलेली देवता आहे. आजच्या दिवशी तुम्हाला धन लाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे; परंतु, यासोबतच तुम्ही दान-पुण्य ही केले पाहिजे, कारण यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल. तुमच्या केलेल्या कामाबद्दल तुमचे सिनिअर आज तुमचे कौतुक करतील, ज्यामुळे तुम्हाला खूप आनंद होईल. आज तुमचा शुभ अंक 4 आणि रंग करडा असणार आहे.
advertisement
2/13
वृषभ राशी - आरोग्याच्या दृष्टीने अतिशय चांगला दिवस. तुमचे उल्हसित मन तुम्हाला योग्य ती ऊर्जा पुरवेल आणि आपणास आत्मविश्वास मिळवून देईल. या राशीतील व्यक्ती रिकाम्या वेळेत आज कुठल्याही समस्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न करू शकतात. तुम्ही आणि तुमचा जोडीदार यांच्यात छोट्या छोट्या कारणावरून भांडण होईल; परंतु त्यामुळे दीर्घकाळपर्यंत तुमचे वैवाहिक जीवन बिघडून जाईल. कौटुंबिक जबाबदारी आज तुमच्यावर पडू शकते. आज तुमचा शुभ अंक 3 आणि रंग पिवळा असणार आहे.
advertisement
3/13
मिथुन राशी - आरोग्यविषयक प्रश्नांमुळे कदाचित तुम्हाला अशांततेचा सामना करावा लागेल. कुटुंबातील सदस्य अथवा जीवनसाथी तणाव निर्माण करण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी कोणीतरी तुम्हाला काहीतरी छान ट्रीट देणार आहे. आजचा दिवस हा तुम्हाला मध्यम जाणार आहे. सकाळी आनंद आणि सायंकाळी थोडे कष्ट घ्यावे लागतील. आज तुमचा शुभ अंक 5 आणि रंग आकाशी असणार आहे.
advertisement
4/13
कर्क राशी - अधिक काही खरेदी करण्यासाठी धावण्यापूर्वी तुमच्याकडे आधीपासून जी गोष्ट आहे ती वापरा. तुमच्यातील लहान मूल जागे होईल आणि तुमची निष्पाप वागणूक यामुळे कुटुंबातील समस्या सोडविण्यात तुम्ही महत्त्वाची भूमिका बजावू शकाल. तुम्हाला आज मानसिक शांततेचा अनुभव होईल. आज तुम्हाला जाणीव होईल, की लग्नाच्या वेळी जी वचनं दिली होती, ती सगळी खरी होती, तुमचा/तुमची जोडीदार ही खरंच सोलमेट आहे. कामाच्या ठिकाणी व्यर्थ बोलणे टाळा, याने तुम्हाला फायदा होईल. आज तुमचा शुभ अंक 5 आणि रंग हिरवा असणार आहे.
advertisement
5/13
सिंह राशी - आर्थिक स्थितीतील बदल हे नक्कीच होणार आहेत. घरातील सणांचे, उत्सवाचे वातावरण तुमच्यावरील दडपण कमी करेल. तुम्ही भिन्नलिंगी व्यक्तींमध्ये लोकप्रिय व्हाल आणि त्यांना सहजपणे आकर्षित करून घ्याल. कामाच्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीशी बोलण्याचा तुम्ही बऱ्याच काळापासून प्रयत्न करत असाल, तर आजच्या दिवशी ते शक्य होईल. आज तुमचा शुभ अंक 6 आणि रंग गुलाबी असणार आहे.
advertisement
6/13
कन्या राशी - प्रवास करण्यासाठी तुमची प्रकृती चांगली नाही म्हणून लांबचे प्रवास टाळा. आज तुम्ही धन संबंधाने जोडलेल्या समस्यांच्या कारणाने चिंतीत राहू शकतात. यासाठी तुम्हाला आपल्या कुठल्या विश्वासपात्रचा सल्ला घेतला पाहिजे. आजच्या दिवशी कामाच्या ठिकाणी तुम्ही काहीतरी खास करणार आहात. आज तुम्ही मोकळ्या हवेत फिरणे पसंत कराल. आज तुमचे मन शांत होईल ज्याचा फायदा तुम्हाला पूर्ण दिवस मिळेल. तुमचा शुभ अंक 8 आणि रंग काळा असणार आहे.
advertisement
7/13
तुळ राशी - तुमची ऊर्जा पातळी खूप उच्च असेल. तुमच्या जीवनसाथी सोबत मिळून आज तुम्ही भविष्यासाठी काही आर्थिक योजना बनवू शकतात आणि अपेक्षा आहे की, ही योजना यशस्वी होईल. ताणतणाव, दडपणाच्या काळावर मात करता येईल; मात्र आपल्या कुटुंबाचा पाठिंबा तुम्हाला मदत करेल. आज काही चिंता तुम्हाला दिवसभर त्रास देऊ शकते. त्याच चिंतेला दूर करण्यासाठी तुम्हाला आपल्या घरच्यांसोबत बोलले पाहिजे. आज तुमचा शुभ अंक 4 आणि रंग करडा असणार आहे.
advertisement
8/13
वृश्चिक राशी - तुमच्यातील उच्च आत्मविश्वास आज चांगल्या कामासाठी वापरा. धावपळीचा दिवस असला तरी तुमची ऊर्जा टिकून राहील. मित्रांच्या मदतीमुळे आर्थिक अडचण सुकर होईल. दिवसाची सुरुवात गोड बातमीने होईल. आज तुम्ही आपल्या कुठल्याही वचनाला पूर्ण करू शकणार नाही, ज्यामुळे तुमचा प्रेमी तुमच्याशी नाराज होईल. प्रवास आणि शैक्षणिक सहली यामुळे जागरूकतेत वाढ होईल. आज हातात घेतलेली कामे पूर्ण करा, यामुळे तुम्हाला लाभ होण्याची शक्यता आहे. आज तुमचा शुभ अंक 6 आणि रंग गुलाबी असणार आहे.
advertisement
9/13
धनु राशी - आर्थिक आघाडीवरील सुधारणा तुम्हाला महत्त्वाच्या खरेदीसाठी सोयीस्कर ठरतील. एकमेकांचा दृष्टिकोन समजावून घेऊन वैयक्तिक प्रश्न सोडवा. तुमची समस्या चव्हाट्यावर आणू नका, अन्यथा तुमची बदनामी होण्याची शक्यता अधिक आहे. तुमच्या घरातील कुणी सदस्य आज तुमच्यासोबत वेळ घालवण्याचा हट्ट करू शकतो, ज्या कारणाने तुमचा काही वेळ खराब ही होईल. आज तुमचा शुभ अंक हा 7 आणि रंग पांढरा असणार आहे.
advertisement
10/13
मकर राशी - भांडखोर व्यक्तींशी वाद घातल्यामुळे तुमचा मूड खराब होईल. शहाणपणाने असे प्रसंग टाळा. तुमच्या पैशामुळे आज अनेक समस्या निर्माण होतील - तुमचा खर्च खूप अधिक होईल किंवा तुमचे पाकीट हरवेल - निष्काळजीपणामुळे काही तोटा निश्चितपणे होईल. आपल्या प्रिय व्यक्तीकडून आलेल्या फोनमुळे आपला दिवस उत्तेजनापूर्ण असेल. एक उत्तम दिवस असणार आहे. आज तुम्हाला प्रेमाच्या परमानंदाची अनुभूती येईल. आज तुमचा शुभ अंक 3 आणि रंग पिवळा असणार आहे.
advertisement
11/13
कुंभ राशी - ज्या गोष्टी आपण बदलू शकत नाही त्या स्वीकारण्यास शिका. जीवनात त्याचा उपयोग होतो. आज तुम्हाला धन संबंधित काही समस्या असण्याची शक्यता आहे; परंतु, तुम्ही तुमच्या कौशल्याने हानीला ही नफ्यामध्ये बदलू शकतात. आज घरातील लोकांसोबत बोलणी करते वेळी तुमच्या तोंडातून काही शब्द निघू शकतात ज्यामुळे घरातील लोक नाराज होऊ शकतात. अविवाहित लोकांसाठी आजचा दिवस उत्तम असणार आहे. आज तुमचा शुभ अंक 9 आणि रंग लाल आहे.
advertisement
12/13
मीन राशी - आरोग्य एकदम चोख असेल. खर्च वाढतील, पण त्याचबरोबर वाढलेले उत्पन्न तुमच्या या वाढत्या बिलांची काळजी घेईल. संततीच्या योजना करण्यासाठी उत्तम दिवस आहे. राहिलेली कामे आज मार्गी लागतील. तसेच हातातील कामे करण्यात आज यश मिळेल. विद्यार्थ्यांनी आज आपल्या शिक्षणात लाभ होईल असे कार्य करा. प्रवास होण्याची शक्यता आहे. ज्यामुळे तुम्हाला काहीसा थकवा जाणवेल. एकंदरीत आजचा दिवस हा तुम्हाला प्रश्न ठरणार आहे. आज तुमचा शुभ अंक 7 आणि रंग पांढरा असणार आहे.
advertisement
13/13
टीप - आजचे राशीभविष्य तुमच्या नावाच्या पहिल्या अक्षरावरून येणाऱ्या राशीवर आधारित आहे. हे सर्वसामान्य राशीभविष्य आहे. अचूक आणि वैयक्तिक राशीभविष्यासाठी जवळच्या ज्योतिषांचा सल्ला घ्या.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Aajache Rashibhavishya: यंदाची भाऊबीज खास, या राशींच्या नशिबी धनाची रास, तुमच्यासाठी दिवस कसा? आजचं राशीभविष्य
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल