TRENDING:

Aajache Rashibhavishya: मेष ते मीन ‘या’ राशींना नशिबाची साथ, मंगळवारी हवं ते मिळेल, फक्त ‘या’ चुका टाळा, आजचं राशीभविष्य

Last Updated:
Daily Horoscope: मेष ते मीन राशींसाठी आजचा दिवस संधी आणि आव्हानांचा असेल. ज्योतिषी अशोक पाटील यांच्याकडून आजचं राशीभविष्य जाणून घेऊ.
advertisement
1/13
मेष ते मीन ‘या’ राशींना नशिबाची साथ, मंगळवारी हवं ते मिळेल, फक्त ‘या’ चुका टाळा, आजचं राशीभविष्य
मेष राशीसाठी आजचा दिवस संमिश्र असणार आहे. अनेक छोट्या मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे. परंतु काळजी नसावी. अडचणीच्या काळात तुमच्या जवळच्या व्यक्तीची मदत होईल. आर्थिक व्यवहार करताना हजार वेळा विचार करा. शक्यतो तज्ञांचे मार्गदर्शन घ्या. कुटुंबासोबत जास्त वेळ लावा.
advertisement
2/13
वृषभ राशीसाठी आजचा दिवस बिझी असणार आहे. नोकरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी कामाच्या जबाबदारी अधिक वाढू शकते. तुमच्या हुशारीचा फायदा होईल. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. त्यामुळे कामाच्या धावपळीत आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.
advertisement
3/13
मिथुन राशीसाठी आजचा दिवस ठीक असणार आहे. कामामध्ये फोकस ठेवा तरच कामे पूर्ण होतील. आर्थिक लाभ होण्याची देखील शक्यता आहे. आज अध्यात्मिक कार्य तुमच्या हातून घडेल. अचानक आनंदाची बातमी मिळेल.
advertisement
4/13
कर्क राशीसाठी आजचा दिवस शुभ योग घेऊन येत आहे. प्रलंबित कामे पूर्ण होतील. आत्मविश्वास वाढेल. अडचणीवर उत्तर मिळेल. तुम्ही जे कामे कराल त्यात तुम्हाला नशिबाची साथ लाभेल. आर्थिक खर्च होण्याची शक्यता आहे. घरातील ज्येष्ठ मंडळीची काळजी घ्या.
advertisement
5/13
सिंह राशीसाठी आजचा दिवस भावनिक असणार आहे. मन अस्थिर जाणवेल कोणत्याच कामात लक्ष लागणार नाही. जवळच्या व्यक्तीसोबत मतभेद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संयम बाळगा. आज महत्त्वाचे निर्णय घेणे शक्यतो टाळा. स्वतःला वेळ द्या.
advertisement
6/13
कन्या राशीसाठी आजचा दिवस थोडा विचार करून निर्णय घेण्याचा आहे. कामात संयम ठेवल्यास फायदा होईल. काही महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलले तर चांगले राहील. आर्थिक व्यवहारात सावधगिरी ठेवा. घरात छोट्या कारणावरून वाद होऊ शकतो. आरोग्याची काळजी घ्या.
advertisement
7/13
तुळ राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. अनेक चांगल्या घटना तुमच्या सोबत घडतील. कुठे गुंतवणूक करत असाल तर ते लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. दशम स्थानात गुरु असल्यामुळे गुरुंप्रति श्रद्धा आणि निष्ठा वाढेल. सायंकाळी पाहुणे मंडळी घरी येण्याची शक्यता आहे.
advertisement
8/13
आजचा दिवस वृश्चिक राशीच्या लोकांनी थोडा जपून वागण्याचा आहे. कामाच्या ठिकाणी काही लोक तुमच्यावर टीका किंवा विरोध करू शकतात, त्यामुळे शांत राहून योग्य निर्णय घ्या. कोणताही व्यवहार करताना घाई करू नका, सर्व माहिती नीट वाचूनच पुढे जा. पैशांच्या बाबतीत आज खर्च वाढण्याची शक्यता आहे, म्हणून अनावश्यक खर्च टाळा. घरात लहान कारणावरून वाद होऊ शकतो, त्यामुळे बोलताना संयम ठेवा.
advertisement
9/13
धनु राशीसाठी आजचा दिवस हा अत्यंत शुभ असणार आहे. अनेक चांगल्या गोष्टी तुमच्या हातून घडतील. वडीलधाऱ्या व्यक्तींकडून तुमचं कौतुक होईल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता देखील आहे. आरोग्याची काळजी घ्या.
advertisement
10/13
मकर राशीसाठी आजचा दिवस थोडा धावपळीचा जाऊ शकतो. कामात प्रगती होईल, पण अपेक्षित निकाल मिळवण्यासाठी मेहनत जास्त करावी लागेल. काही कामं वेळेत पूर्ण करण्याचा दबाव राहील, त्यामुळे नियोजन करून पुढे जा. अनावश्यक खर्च टाळा. घरात एखादी नवीन जबाबदारी तुमच्यावर येऊ शकते.
advertisement
11/13
आजचा दिवस कुंभ राशीसाठी ‘कधी खुशी तर कधी गम’ अशा पद्धतीचा असणार आहे. काही गोष्टी मनासारख्या होतील तर काही ठिकाणी अडचणी येतील. आर्थिक बाबतीत फायदा होईल, पण अचानक खर्चही होऊ शकतो. मित्रांकडून सहकार्य मिळेल. कामात प्रगती होईल. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
advertisement
12/13
मीन राशीसाठी आजचा दिवस शुभ आहे. नशिबाची साथ मिळेल. अडकलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. घरात आनंदाचे वातावरण राहील. नोकरी आणि व्यवसायात चांगली प्रगती होईल. आरोग्य चांगले राहील.
advertisement
13/13
टीप - आजचे राशीभविष्य तुमच्या नावाच्या पहिल्या अक्षरावरून येणाऱ्या राशीवर आधारित आहे. हे सर्वसामान्य राशीभविष्य आहे. अचूक आणि वैयक्तिक राशीभविष्यासाठी जवळच्या ज्योतिषांचा सल्ला घ्या.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Aajache Rashibhavishya: मेष ते मीन ‘या’ राशींना नशिबाची साथ, मंगळवारी हवं ते मिळेल, फक्त ‘या’ चुका टाळा, आजचं राशीभविष्य
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल