Aajache Rashibhavishya: मंगळवारी 9 राशींचं भाग्य चमकणार, पण ‘ती’ चूक भोवणार, तुमच्या नशिबी काय? आजचं राशीभविष्य
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
Last Updated:
Daily Horoscope: आजचा मंगळवार मेष ते मीन राशींसाठी चढउतारांचा राहील. तुमच्या नशिबात काय? हे आजचं राशीभविष्य नाशिकचे ज्योतिषी अमोघ पाडळीकर यांच्याकडून जाणून घेऊ.
advertisement
1/13

मेष राशी - गुंतवणूक करणे बऱ्याच वेळा तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. आज तुम्हाला ही गोष्ट लक्षात येऊ शकते, कारण जुन्या गुंतवणुकीतून आज तुम्हाला उत्तम नफा होऊ शकतो. आज कार्यक्षेत्रात तुमच्या कुणी जुन्या कामाचे कौतुक होऊ शकते. तुमच्या कामाला पाहून आज तुमचे कौतुक आणि प्रगती होण्याची शक्यता आहे. तुमचा शुभ अंक 7 आहे.
advertisement
2/13
वृषभ राशी - काही ठिकाणी तुम्हाला जबरदस्त माघार घ्यावी लागू शकेल. अपेक्षित ध्येयासाठी कठोर परिश्रम घ्या. तुमच्या मनात काही दुविधा येतील जे तुम्हाला एकाग्र होऊ देणार नाही. तुमचे पालक तुमच्या जोडीदाराला आज सुंदरशी भेट देतील, ज्यामुळे तुमचे वैवाहिक आयुष्य अधिक सुंदर होईल. तुम्ही आज तुमचे पाऊल व्यवस्थित टाकलेत तर अतिरिक्त रोख रक्कम कमावू शकाल. आज तुमचा शुभ अंक 7 असणार.
advertisement
3/13
मिथुन राशी - कुणी जवळच्या नातेवाइकाच्या मदतीने आज तुम्ही आपल्या व्यवसायात उत्तम प्रगती करू शकतात, ज्यामुळे तुम्हाला आर्थिक लाभही होईल. नवे तंत्रज्ञान शिकणे आणि आपले कौशल्य वाढविण्यास त्याचा फायदा होईल. गेले बरेच दिवस तुम्हाला शापित असल्यासारखं वाटत असेल, तर आज तुम्हाला आशीर्वाद मिळाल्यासारखे वाटेल. आज तुमचा शुभ अंक 5 आहे.
advertisement
4/13
कर्क राशी - अचानक पैसा आल्याने तुमची प्रलंबित बिले आणि ताबडतोब करावयाचे खर्च भागतील. सतत हसतमुख अशा आपल्या स्वभावामुळे आणि आनंदी, उत्साही, प्रेमळ अशा मूडमुळे आपल्या सभोवतालच्या सर्वांना आनंद आणि सुख लाभेल. कामाच्या ठिकाणी आज तुमचा सगळ्यांवर प्रभाव राहील. आज तुमचा शुभ अंक 8 असणार आहे.
advertisement
5/13
सिंह राशी- बहुतांश घटना आपणाला हव्या तशा घडल्यामुळे उत्साहाने खळाळता, प्रसन्नदायी असा आजचा दिवस असेल. आर्थिक व्यवहार आणि वायदे अतिशय काळजीपूर्वक सांभाळा. जे लोक आत्तापर्यंत सिंगल आहेत त्यांची भेट आज कुठल्या खास व्यक्तीसोबत होण्याची शक्यता. तुमचा प्रियकर/प्रेयसी तुमच्यावर किती प्रेम करतो/करते याची आज तुम्हाला जाणीव होईल. आज तुमचा शुभ अंक 7 असणार आहे.
advertisement
6/13
कन्या राशी - आपल्या माहितीतील लोकांमुळे उत्पन्नाचा नवा स्रोत सुरू होईल. नेहमीपेक्षा आज तुम्ही उच्च लक्ष्य गाठण्याचा प्रयत्न कराल - अपेक्षित निकाल मिळाला नाही तरी नाराज होऊ नका. नव्या कल्पनांची परीक्षा घेण्यासाठी योग्य दिवस आहे. लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधलेल्या असतात, असं का म्हणतात, ते तुम्हाला आज कळेल. आज तुमचा शुभ अंक 8 असणार आहे.
advertisement
7/13
तुळ राशी- बोलण्यापूर्वी दोनवेळा विचार करा. तुमच्या बोलण्यामुळे अनवधानाने कुणाच्या तरी भावना दुखावल्या जातील. व्यावसायिक विषय मार्गी लावण्यासाठी मित्रांचा पाठिंबा मूल्यवान ठरेल. आजचा दिवस तुमच्यासाठी खूप उत्तम राहणार आहे. आज तुम्हाला आपल्यासाठी पर्याप्त वेळ मिळेल. तुमच्या जोडीदारासमवेत घालवलेल्या सुंदर आठवणींना उजाळा मिळेल. आज तुमचा शुभ अंक 7 असणार आहे.
advertisement
8/13
वृश्चिक राशी - विशेष प्रशंसा ही तुमच्यासाठी आनंदाचा स्रोत असेल. गोष्टी व्यवस्थित ऐकण्याची आवश्यकता आहे अथवा येणाऱ्या काळात तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागू शकतो. आज तुम्हाला मिळालेल्या मोकळ्या वेळेचा फायदा घ्या. तुम्ही तुमच्या संकल्पना चांगल्या तऱ्हेने मांडल्यात आणि तुमच्या कामात उत्साह आणि शेवटपर्यंत चिकाटी दाखवलीत तर तुम्ही फायद्यात राहाल. आज तुमचा शुभ अंक 9 आहे.
advertisement
9/13
धनु राशी - आपल्या माहितीतील लोकांमुळे उत्पन्नाचा नवा स्रोत सुरू होईल. आजचा दिवस खूपच सुंदर असेल. प्रेमामध्ये एकतर्फी वेड, मोह आजच्या दिवशी दुर्भाग्यपूर्ण, अनर्थावह ठरेल. दैनंदिन गरजा न भागविल्या गेल्यामुळे तुमच्या वैवाहिक आयुष्यात काहीसा तणाव निर्माण होईल. जोपर्यंत तुम्ही वादविवादात पडत नाही तोपर्यंत कोणते कठोर विधान न करण्याची काळजी घ्या. आज तुमचा शुभ अंक 6 असणार आहे.
advertisement
10/13
मकर राशी - पुरातन वस्तू आणि दागदागिन्यांमधील गुंतवणूक फायदा आणि समृद्धी आणेल. कामानिमित्त खाजगी कार्यक्रमांना जाण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून कामाच्या ठिकाणी तुम्हाला अडथळे निर्माण होत असतील, तर आजचा दिवस मात्र चांगला आहे. तुमचा/तुमची जोडीदार पुरेसा वेळ देईल. आजचा तुमचा 9 असणार आहे.
advertisement
11/13
कुंभ राशी - कुटुंबियांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत, यासाठी तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा. तुमच्या हातून काही मोठ्या चुका घडू शकतात, याची जाणीव ठेवा. आज दिवसभर तुमचे प्रेम बहरत जाणार आहे. कामाच्या अधिकतेच्या व्यतिरिक्त आज कार्यक्षेत्रात तुमच्यात ऊर्जा पाहिली जाऊ शकते. आज तुम्ही दिलेल्या कामाला ठरलेल्या वेळेच्या आधीच पूर्ण करू शकतात. आज तुमचा शुभ अंक 4 असणार आहे.
advertisement
12/13
मीन राशी - गुंतवणूक करणे श्रेयस्कर आहे, पण त्यासाठी योग्य सल्ला घ्यावा. तुमच्या यशाच्या मार्गात जे अडथळा होऊ पाहत होते, त्यांच्या कारकिर्दीची आज तुमच्या डोळ्यादेखत उतरंड सुरू होईल. प्रवास करावा लागणार असेल तर सर्व महत्त्वाची कागदपत्रे बरोबर ठेवा. लग्न ही तुमच्या आयुष्यात घडलेली सर्वात उत्तम घटना आहे, याची प्रचिती तुम्हाला येईल. आज तुमचा शुभ अंक 1 असणार आहे.
advertisement
13/13
टीप - आजचे राशीभविष्य तुमच्या नावाच्या पहिल्या अक्षरावरून येणाऱ्या राशीवर आधारित आहे. हे सर्वसामान्य राशीभविष्य आहे. अचूक आणि वैयक्तिक राशीभविष्यासाठी जवळच्या ज्योतिषांचा सल्ला घ्या.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Aajache Rashibhavishya: मंगळवारी 9 राशींचं भाग्य चमकणार, पण ‘ती’ चूक भोवणार, तुमच्या नशिबी काय? आजचं राशीभविष्य