18 महिन्यानंतर बदलणार 'या' 3 राशींच्या लोकांचं नशीब, दुर्मिळ योगामुळे लागणार लॉटरी, पैशाने भरणार तिजोरी
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या युतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जेव्हा दोन शक्तिशाली ग्रह एकाच राशीत एकत्र येतात, तेव्हा त्याचे परिणाम संपूर्ण सृष्टीवर आणि मानवी जीवनावर होतात.
advertisement
1/7

ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या युतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जेव्हा दोन शक्तिशाली ग्रह एकाच राशीत एकत्र येतात, तेव्हा त्याचे परिणाम संपूर्ण सृष्टीवर आणि मानवी जीवनावर होतात.
advertisement
2/7
तब्बल 18 महिन्यांनंतर सूर्य आणि मंगळ या दोन अग्नी तत्त्वाच्या ग्रहांचा अत्यंत दुर्मिळ असा 'आदित्य मंगल योग' जुळून येत आहे. जानेवारी 2026 मध्ये सूर्य आणि मंगळ हे दोन्ही ग्रह शनीच्या स्वामित्वाखालील मकर राशीत एकत्र येणार आहेत.
advertisement
3/7
14 जानेवारी 2026 रोजी सूर्य मकर राशीत प्रवेश करेल आणि त्यानंतर 18 जानेवारीला मंगळही याच राशीत येईल. या युतीमुळे निर्माण होणारा राजयोग मीन, मकर आणि कन्या या तीन राशींच्या आयुष्यात सोन्याचे दिवस घेऊन येणार आहे.
advertisement
4/7
मकर - स्वतःच्या राशीत राजयोग: हा संयोग मकर राशीच्या पहिल्याच घरात होत आहे. यामुळे तुमच्या आत्मविश्वासात मोठी वाढ होईल. 18 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर तुमची रखडलेली कामे वेगाने पूर्ण होतील. राजकारण किंवा प्रशासकीय सेवेत असलेल्या लोकांसाठी हा काळ सुवर्णकाळासारखा असेल. तुम्हाला मोठे पद किंवा मान-सन्मान मिळू शकतो.
advertisement
5/7
कन्या - करिअरमध्ये मोठी भरारी: कन्या राशीच्या जातकांसाठी हा संयोग पाचव्या घरात होणार आहे. जे लोक बऱ्याच काळापासून नोकरी बदलण्याचा किंवा परदेशात जाण्याचा विचार करत आहेत, त्यांना यश मिळेल. शेअर मार्केट किंवा लॉटरीतून अचानक धनलाभाचे योग आहेत. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत शुभ असून स्पर्धा परीक्षेत यश निश्चित आहे.
advertisement
6/7
मीन - उत्पन्नात प्रचंड वाढ: मीन राशीच्या लोकांसाठी हा संयोग 11 व्या घरात होणार आहे. तुमच्या उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण होतील. जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त परतावा मिळेल. तुमच्या बँक बॅलन्समध्ये मोठी वाढ होईल आणि कुटुंबातील आर्थिक विवंचना दूर होतील.
advertisement
7/7
18 महिन्यांनंतर येणारा हा बदल मीन, मकर आणि कन्या राशींच्या आयुष्यात समृद्धी घेऊन येणार आहे. वर्षाची ही सुरुवात तुमच्यासाठी भविष्यातील प्रगतीचा पाया ठरेल. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
18 महिन्यानंतर बदलणार 'या' 3 राशींच्या लोकांचं नशीब, दुर्मिळ योगामुळे लागणार लॉटरी, पैशाने भरणार तिजोरी