TRENDING:

Rashi: या राशींच्या लोकांसाठी दिवाळी भाग्य उजळणारी! शनिकृपेनं नोकरी-व्यवसायात लाभाचे योग

Last Updated:
Saturn Nakshatra Parivartan 2023: दिवाळी सण यंदा 10 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. 12 नोव्हेंबर रोजी नरक चतुर्दशी, लक्ष्मी-कुबेर पूजन केलं जाईल, या दिवशी धनाची देवी लक्ष्मीची पूजा केली जाते, जेणेकरून देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने वर्षभर सुख-समृद्धी राहो. दिवाळी हा हिंदू धर्मातील वर्षातील सर्वात मोठा सण आहे. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीकोनातून या वर्षीची दिवाळी खूप खास असणार आहे, कारण सर्वात महत्त्वाचा ग्रह मानला जाणारा शनि दिवाळीपूर्वी आपले नक्षत्र बदलेल आणि नंतर राशी परिवर्तन करेल. 15 ऑक्टोबरला नक्षत्र बदलल्यानंतर 4 नोव्हेंबरपासून शनि मार्गी होईल. सध्या शनि कुंभ राशीत वक्री स्थितीत भ्रमण करत आहे. शनीच्या स्थितीत होणारे हे दोन महत्त्वाचे बदल 5 राशीच्या लोकांसाठी खूप शुभ ठरणार आहेत. या लोकांची दिवाळीपूर्वीच दिवाळी साजरी होईल, असे म्हणता येईल.
advertisement
1/5
या राशींच्या लोकांना दिवाळी भाग्य उजळवणारी! शनिकृपेनं नोकरी-व्यवसायात लाभाचे योग
मेष : मेष राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढेल. नवीन कार किंवा घर खरेदी करू शकता. जोडीदाराच्या तब्येतीत सुधारणा होईल. विशेषतः व्यवसायाची स्थिती मजबूत असेल. तुम्ही तुमची नोकरी बदलू शकता. अडकलेला पैसा मिळेल.
advertisement
2/5
वृषभ : वृषभ राशीच्या लोकांना जुन्या आजारांपासून आराम मिळेल. आर्थिक लाभाच्या संधी मिळतील. नोकरीत प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. कुटुंबात धार्मिक आणि शुभ कार्ये होतील. अडकलेले पैसे मिळाल्याने तुमचा बँक बॅलन्स वाढेल. तुम्हाला एकापेक्षा जास्त स्त्रोतांमधून पैसे मिळतील. विवाह निश्चित होऊ शकतो.
advertisement
3/5
मिथुन: मिथुन राशीच्या लोकांना वडिलोपार्जित संपत्तीचा फायदा होऊ शकतो. पैसे मिळतील. कर्मचाऱ्यांच्या बदल्या होऊ शकतात. वाहन सुख मिळेल. व्यवसायात वाढ होईल. लाभाच्या संधी मिळतील. तुम्हाला कुटुंबातील सदस्यांकडून साथ आणि सहकार्य मिळेल. मुलांशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते.
advertisement
4/5
कन्या : तुमच्या जुन्या समस्या संपल्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल. नोकरीच्या ठिकाणी तुमची स्थिती सुधारेल. तुम्हाला नवीन नोकरी किंवा बढती मिळू शकते. खर्च कमी होईल, उत्पन्न वाढेल. बदलाची संधी मिळू शकते. नवीन कार खरेदी करू शकता.
advertisement
5/5
धनु: कुटुंबाच्या पाठिंब्याने तुम्ही मोठी कामे पूर्ण करू शकाल. घर आणि वाहन सुख मिळू शकते. व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन मिळू शकते. अधिकारी तुमच्यावर मेहरबान असतील. तुमच्या मुलांकडून तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Rashi: या राशींच्या लोकांसाठी दिवाळी भाग्य उजळणारी! शनिकृपेनं नोकरी-व्यवसायात लाभाचे योग
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल