TRENDING:

Gajkesari Yog 2025: 10 नोव्हेंबरला पुन्हा गजकेसरी राजयोग! गुरु-चंद्राच्या युतीने या राशीच्या लोकांवर धन बरसात

Last Updated:
Gajkesari Yog 2025: ज्योतिषशास्त्रात गुरू ग्रहाचं राशी परिवर्तन खूप विशेष मानलं जातं, त्याचा सर्व राशींवर परिणाम होतो. सध्या, गुरू त्याच्या उच्च कर्क राशीत संक्रमण करत आहे आणि 10 नोव्हेंबर रोजी चंद्र देखील कर्क राशीत प्रवेश करेल. परिणामी, चंद्र आणि गुरू एकत्रित होऊन कर्क राशीत गजकेसरी योग तयार करतील. गेल्या 18 ऑक्टोबर रोजी गुरूने कर्क राशीत प्रवेश केला असून 5 डिसेंबरपर्यंत तो तिथेच राहणार आहे.
advertisement
1/5
10 नोव्हेंबरला पुन्हा गजकेसरी राजयोग! गुरु-चंद्राच्या युतीने या राशींना लाभ
पंचांगानुसार, 10 डिसेंबर रोजी दुपारी 1:02 वाजता पुन्हा गुरू आणि चंद्र गजकेसरी योग तयार करतील. दरम्यान, कर्क राशीत प्रवेश करून गुरूने आधीच हंस महापुरुष राजयोगाची स्थापना केली आहे. त्यासोबतच गजकेसरी योग अनेक राशींना शुभफळदायी ठरणार आहे.
advertisement
2/5
मेष - गजकेसरी योग मेष राशीच्या लोकांच्या जीवनात सौभाग्याचे नवीन दरवाजे उघडेल. दीर्घकाळ रखडलेली कामे आता गती घेतील. करिअरमध्ये प्रगती आणि ओळख मिळण्याची दाट शक्यता आहे. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांसाठी हा खूप अनुकूल काळ आहे. आर्थिक परिस्थिती सुधारेल आणि कुटुंबात आनंदी वातावरण राहील.
advertisement
3/5
कर्क - कर्क राशीच्या लोकांसाठी हा योग आर्थिकदृष्ट्या अत्यंत शुभ राहील. पैसे कमविण्याच्या नवीन संधी निर्माण होतील आणि अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात चांगला नफा होईल, ज्यामुळे आत्मविश्वास वाढेल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद निर्माण होईल आणि प्रेमसंबंधही गोड होतील.
advertisement
4/5
कन्या - कन्या राशीच्या लोकांसाठी, हा योग नशीब चमकण्याचे संकेत देतोय. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा सन्मान मिळण्याची शक्यता जास्त आहे. वरिष्ठ किंवा प्रभावशाली व्यक्तीकडून मिळालेल्या सहकार्यामुळे कामात यश मिळेल. कुटुंबात शुभ घटना घडू शकतात. मानसिक शांती राहील आणि आरोग्य सुधारेल.
advertisement
5/5
गजकेसरी योग म्हणजे काय?गजकेसरी योग हा एक अत्यंत शुभ ज्योतिषीय संयोग मानला जातो. हे दोन्ही ग्रह एकमेकांशी युती किंवा दृष्टी संबंध निर्माण करतात तेव्हा हा योग तयार होतो. हा योग व्यक्तीला हत्तीचे बल आणि सिंहाचे शौर्य मिळवून देतो. या योगाच्या प्रभावाखाली, व्यक्तीला संपत्ती, आदर, ज्ञान आणि यश मिळते. हा योग व्यक्तीचे व्यक्तिमत्व वाढवतो आणि जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रगतीच्या संधी देतो.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Gajkesari Yog 2025: 10 नोव्हेंबरला पुन्हा गजकेसरी राजयोग! गुरु-चंद्राच्या युतीने या राशीच्या लोकांवर धन बरसात
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल