TRENDING:

Gajlaxmi Rajyog: गजलक्ष्मी राजयोग अखेर जुळला! आता चमकण्याचे दिवस या 4 राशींच्या नशिबात

Last Updated:
July Horoscope Marathi: श्रावण महिन्यात शुक्र आणि गुरू एकत्रितपणे मिथुन राशीत एक शक्तिशाली गजलक्ष्मी राजयोग तयार करत आहेत. हा काळ अनेक राशींसाठी शुभ ठरेल. जाणून घेऊया कोणत्या राशी भाग्यवान ठरू शकतात.
advertisement
1/5
गजलक्ष्मी राजयोग अखेर जुळला! आता चमकण्याचे दिवस या 4 राशींच्या नशिबात
जुलैच्या शेवटच्या दिवसांत शुक्र आणि गुरू एकत्रितपणे गजलक्ष्मी राजयोग तयार करणार आहेत. सध्या गुरू मिथुन राशीत भ्रमण करत आहे आणि २६ जुलै रोजी शुक्र देखील मिथुन राशीत भ्रमण करेल, अशा प्रकारे, गुरू शुक्राच्या मिथुन राशीत संयोगाने गजलक्ष्मी राजयोग तयार होईल, हा शुभ योग २१ ऑगस्टपर्यंत प्रभावी असेल.
advertisement
2/5
मिथुन - मिथुन राशीच्या लोकांना गजलक्ष्मी राजयोगाचा विशेष लाभ होईल. अविवाहित लोकांना लग्नाचं चांगलं स्थळ चालून येऊ शकतं. अडकलेले मोठे काम पूर्ण होईल. समाजात तुमचा आदर वाढू शकतो, जुन्या इच्छा पूर्ण होऊ शकतात. नशिबाची उत्तम साथ मिळत राहील. उत्पन्न वाढवण्याचे मार्ग खुले राहतील. व्यवसायात काही सरकारी काम मिळू शकतात. कुटुंबाशी संबंध सुधारतील.
advertisement
3/5
सिंह - गजलक्ष्मी राजयोग सिंह राशीच्या लोकांना अनेक फायदे मिळवून देईल. परदेशात प्रवासाच्या संधी मिळू शकतील. गुंतवणूक मोठे फायदे देऊ शकते. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवू शकाल. आर्थिक स्थिती सुधारेल. नोकरीत बढती मिळू शकेल. व्यवसायात संपत्ती वाढीचे मार्ग सापडतील. प्रेम प्रकरणे घट्ट जुळतील, यश मिळेल.
advertisement
4/5
कन्या - गजलक्ष्मी राजयोगात कन्या राशीच्या लोकांना विशेष फायदे मिळतील. नोकरीत पद आणि पगार वाढीचे मार्ग खुले होतील. बेरोजगारांना नोकरीच्या संधी मिळतील. अडकलेले पैसे मिळतील. अविवाहितांना लग्नाचं चांगलं स्थळ येऊ शकतं. तुम्हाला वडिलोपार्जित मालमत्तेचा लाभ मिळेल आणि मुलांकडून चांगली बातमी मिळेल. सन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल.
advertisement
5/5
कुंभ - गजलक्ष्मी राजयोग कुंभ राशीच्या लोकांसाठी चांगला काळ आणेल. आर्थिक स्थिती चांगली असेल, नशिबाची साथ तुम्हाला मिळेल. नोकरीत पदोन्नती आणि पगार वाढण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणात प्रचंड यश मिळेल. प्रेम संबंध छान असतील. कुठेतरी अडकलेले पैसे परत मिळतील. अचानक पैसे मिळू शकतात.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Gajlaxmi Rajyog: गजलक्ष्मी राजयोग अखेर जुळला! आता चमकण्याचे दिवस या 4 राशींच्या नशिबात
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल