TRENDING:

Guru Margi: सुस्साट अतिचारी झालेला गुरू ग्रह वर्ष 2026 मध्ये या राशींना बक्कळ फायदा देणार

Last Updated:
Astrology 2026 : ज्योतिषशास्त्रात ग्रहांचे राशीपरिवर्तन होण्याव्यतिरिक्त ग्रहांच्या वेगवेगळ्या स्थितींचा विचारही केला जातो. सर्व ग्रहांची भ्रमण करण्याची ठराविक गती असते. एक फेरा पूर्ण करण्यासाठी काही ग्रहांना खूप वेळ लागतो तर काही लगेच पूर्ण करतात. देवांचा गुरु मानला जाणारा गुरू ग्रह तसा संतगती मानला जातो, त्याचं साधारण वर्षातून एकदाच गोचर व्हायचं. पण, सध्या तशी परिस्थिती नाही, आता गुरू ग्रहानं वेग पकडला असून तो अतिचारी झालाय. म्हणजे ज्योतिषशास्त्रानुसार तो दुप्पट वेगानं भ्रमण करतोय. त्याची ही स्थिती नवीन वर्ष 2026 मध्येही कायम राहणार आहे. याचा काही राशींना खूप फायदा होणार आहे. त्या राशींविषयी जाणून घेऊया.
advertisement
1/6
सुस्साट अतिचारी झालेला गुरू ग्रह वर्ष 2026 मध्ये या राशींना बक्कळ फायदा देणार
दिनांक 11 नोव्हेंबर रोजी गुरू कर्क राशीत वक्री झाला नंतर 5 डिसेंबर रोजी पुन्हा मिथुन राशीत परत येईल. 11 मार्च 2026 रोजी गुरू सरळ मार्गी होईल, ज्यामुळे अनेक राशींसाठी भाग्याचे नवे दरवाजे उघडतील. गुरुच्या स्थितीमुळे या काळात काही लोकांना अचानक नशिबाची साथ, अपूर्ण कामांमध्ये प्रगती आणि रखडलेल्या प्रकल्पांमध्ये गती अनुभवता येईल.
advertisement
2/6
मेष - गुरू ग्रहाची वक्री चाल आणि पुन्हा सरळ मार्गक्रम होणं काही काळ स्थिरतेनंतर मेषच्या लोकांच्या जीवनात अचानक गती आणेल. रखडलेल्या प्रकल्पांना गती मिळेल. नोकऱ्या आणि करिअरमध्ये नवीन संधी उघडतील. आर्थिक लाभाची शक्यता असेल. मार्च 2026 नंतर रखडलेल्या कामांना गती मिळेल.
advertisement
3/6
मेष राशीच्या लोकांना नोकरी आणि करिअरमध्ये नवीन संधी उपलब्ध होतील. आर्थिक लाभाची शक्यता असेल. अभ्यास, स्पर्धा परीक्षा आणि परदेश व्यवहारात प्रगती शक्य होईल. कौटुंबिक जबाबदाऱ्या काही काळ वाढू शकतात, परंतु त्यांचे परिणाम सकारात्मक असतील.
advertisement
4/6
मिथुन - मिथुन राशीच्या लोकांसाठी हा काळ सर्वात महत्वाचा आहे, कारण गुरूचे भ्रमण तुमच्या जीवनावर थेट परिणाम करेल. कामात आत्मविश्वास वाढेल, परंतु कधीकधी गोंधळ देखील निर्माण होऊ शकतो. वक्री गुरू तुम्हाला जुन्या कामांवर पुनर्विचार करण्यास भाग पाडेल, पण ते फायदेशीरच ठरेल. पैसे कमविण्याचे नवीन मार्ग सापडतील, परंतु उत्पन्न आणि खर्चातही चढ-उतार होतील. नातेसंबंधांमध्ये स्पष्टतेची आवश्यकता असेल. मार्च 2026 नंतर परिस्थिती पूर्णपणे तुमच्या बाजूने असेल. तुम्हाला पदोन्नती किंवा मोठी संधी मिळू शकते. महत्त्वाची कागदपत्रे आणि आर्थिक निर्णय काळजीपूर्वक घ्या.
advertisement
5/6
वृश्चिक - गुरूची अतिचारी स्थिती वृश्चिक राशीच्या लोकांना नवं काही देईल. वक्री गुरूचा तुमच्या नशिबावर, प्रवासावर आणि शिकण्याच्या संधींवर थेट परिणाम होईल. नशिबाची साथ असेल, प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. परदेशी प्रवास, उच्च शिक्षण आणि नवीन कौशल्ये शिकण्याच्या संधी निर्माण होतील.
advertisement
6/6
नोकरी बदलण्यासाठी किंवा महत्त्वाचे करिअर निर्णय घेण्यासाठी वृश्चिक राशीच्या लोकांना मार्च 2026 नंतरचा काळ उत्तम असेल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद वाढेल. आरोग्य सुधारेल आणि मानसिक शांती वाढेल. कोणत्याही मोठ्या भागीदारी किंवा कायदेशीर बाबींमध्ये मात्र सावध राहा.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Guru Margi: सुस्साट अतिचारी झालेला गुरू ग्रह वर्ष 2026 मध्ये या राशींना बक्कळ फायदा देणार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल