Numerology: जिथं जातील तिथं पहिल्या नंबरातच..! या जन्मतारखांच्या मुली कुटुंबाचं नशीब पालटतात
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Numerology Marathi: मूलांक 3 चा स्वामी गुरू ग्रह आहे, तो ज्ञान, बुद्धी, आणि समृद्धीचा कारक मानला जातो. यामुळेच मूलांक 3 असलेल्या मुलींमध्ये या ग्रहाचे काही विशेष गुण दिसून येतात. या मुली खूप आत्मविश्वासू आणि महत्त्वाकांक्षी असतात. त्यांच्यात काहीतरी मोठं करण्याची जिद्द असते आणि त्या ध्येयपूर्तीसाठी खूप मेहनत करतात. त्यांना स्वतःच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास असतो.
advertisement
1/6

ज्ञान आणि बुद्धिमत्ता - गुरुच्या प्रभावामुळे या मुली अतिशय बुद्धिमान आणि ज्ञानी असतात. त्यांना नवीन गोष्टी शिकायला आणि ज्ञान मिळवायला खूप आवडतं. त्या कोणत्याही विषयावर सखोल विचार करतात आणि त्यांच्याकडे योग्य मार्गदर्शन करण्याची क्षमता असते.
advertisement
2/6
आज आपण मूलांक 3 असलेल्या मुलींच्या विषयी जाणून घेत आहोत. ज्या मुलींचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3,12, 21 किंवा 30 तारखेला झाला असेल, त्यांचा मूलांक 3 असतो. 3 मूलांक असलेल्या मुली खूप भाग्यवान मानल्या जातात.
advertisement
3/6
या मुलींमध्ये उत्कृष्ट नेतृत्व गुण असतात. त्या उत्तमप्रकारे व्यवस्थापन करू शकतात आणि आपल्या कामात इतरांना योग्य दिशा दाखवतात. त्यामुळे, त्या सहसा समाजात किंवा कामाच्या ठिकाणी चांगल्या पदांवर पोहोचतात. तसंच या मुलींशी संबंधित लोकांसाठीही त्या भाग्यवान ठरतात.
advertisement
4/6
मूलांक 3 असलेल्या मुलींसाठी न्यायाधीश, वकील यांसारख्या प्रशासकीय पदांवर आणि शैक्षणिक क्षेत्रात मोठं यश मिळतं. या मुली ठरवलेलं काम पूर्ण करतातच. एकदा एखादं काम करायचं ठरवलं की, त्या ते यशस्वीरित्या पूर्ण केल्याशिवाय शांत बसत नाहीत.
advertisement
5/6
त्यांच्या मेहनतीमुळे, कष्टांमुळे त्यांना त्यांच्या जीवनातील सर्व सुख-सुविधा आणि यश मिळतं. इतरांना मदत करण्यात असतात आघाडीवर मूलांक 3 असलेल्या मुली उत्तम आणि यशस्वी जीवन जगतात; त्या इतरांच्या भल्यासाठीही खूप काम करतात.
advertisement
6/6
या सोबतच मूलांक 3 असलेल्या मुलींच्या स्वभावामध्ये काही नकारात्मक पैलू देखील असू शकतात. कधीकधी त्यांच्यातील जास्त आत्मविश्वास गर्विष्ठपणात बदलू शकतो. तसेच, त्या जिद्दी आणि हट्टी स्वभावाच्या असू शकतात, ज्यामुळे त्यांना इतरांचे ऐकणे थोडे कठीण जाते. मात्र, एकूणच या मुली आपल्या मेहनतीने आणि ज्ञानाने आयुष्यात खूप यशस्वी होतात.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Numerology: जिथं जातील तिथं पहिल्या नंबरातच..! या जन्मतारखांच्या मुली कुटुंबाचं नशीब पालटतात