TRENDING:

Numerology: मोबाईलसाठी लकी वॉलपेपर! जन्मतारखेनुसार असे फोटो सेट केल्याने मिळेल शुभफळ

Last Updated:
Wallpaper according Vastu: सध्याच्या काळात सकाळी उठल्यावर सर्वप्रथम आपण ज्या गोष्टीकडे पाहतो तो म्हणजे आपला मोबाईल. मोबाईल सुरू करताच स्क्रीनवर वॉलपेपर दिसतो. काही लोक आपले फोटो वॉलपेपर म्हणून लावतात तर काही लोक सुंदर फोटो लावतात. वास्तुशास्त्रानुसार, आपण दिवसातून शेकडो वेळा मोबाईलचा वॉलपेपर पाहत असतो, त्याचा आपल्या आयुष्यावर प्रभाव पडतो. आपल्या सभोवतालच्या प्रत्येक वस्तूचा आपल्या जीवनावर परिणाम होतो. वस्तू योग्य ठिकाणी ठेवल्यास त्याचा सकारात्मक परिणाम होतो. त्याचबरोबर चुकीच्या ठिकाणी ठेवल्यास त्याचा नकारात्मक परिणाम होतो. त्याचप्रमाणे मोबाइल वॉलपेपर देखील आहे.
advertisement
1/11
मोबाईलसाठी लकी वॉलपेपर! जन्मतारखेनुसार असे फोटो सेट केल्याने मिळेल शुभफळ
आपण मोबाईलवर लावत असलेले वॉलपेपरही शुभ अशुभ ठरू शकतात. अंकशास्त्रानुसार आम्ही तुम्हाला मोबाईल वॉलपेपरबद्दल सांगणार आहोत. आपल्या आयुष्यात सकारात्मक गोष्टींसाठी आपण मोबाईल वॉलपेपरमध्ये बदल करून पाहू शकता.
advertisement
2/11
अंकशास्त्रानुसार, फोनचा वॉलपेपर तुमच्या यश आणि नशिबावर परिणाम करू शकतो. अंकशास्त्रानुसार वॉलपेपर निवडण्याच्या काही टिप्स येथे सांगत आहोत.
advertisement
3/11
1, 10, 19 किंवा 28 तारखेला वाढदिवस: उगवणाऱ्या सूर्याचा वॉलपेपर तुम्हाला प्रसिद्धी आणि अधिकार मिळवून देऊ शकतो.
advertisement
4/11
2, 11, 20 किंवा 29 तारखेला वाढदिवस: चंद्र किंवा पाणी असलेला वॉलपेपर तुमच्या मनाला शांती देऊ शकतो.
advertisement
5/11
3, 12, 21, 30 रोजी वाढदिवस: जर तुमची जन्मतारीख यापैकी असेल तर सूर्यफूल वॉलपेपर तुमच्यासाठी शुभ असेल. तुम्हाला नेहमी पुढे जाण्याची प्रेरणा मिळेल आणि मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण करते.
advertisement
6/11
4, 13, 22, 31 रोजी वाढदिवस: जर तुमची जन्मतारीख यापैकी एक असेल तर शांत-निरभ्र आकाशाचा वॉलपेपर तुमच्यासाठी खूप लकी असू शकते. मोबाईल स्क्रीनवरील अशा प्रकारचा वॉलपेपर तुम्हाला एकाग्र होण्यास आणि शांती देण्यास मदत करेल.
advertisement
7/11
5, 14, 23 तारखेला वाढदिवस: जर तुमची जन्मतारीख यापैकी असेल तर देवी लक्ष्मीचा वॉलपेपर तुमच्यासाठी शुभ ठरू शकतो. तुमच्या मोबाईलवरील असा वॉलपेपर लक्ष्मी म्हणजेच संपत्तीला आकर्षित करेल. शिवाय हा वॉलपेपर तुमच्या मनात सकारात्मक ऊर्जा आणू शकतो.
advertisement
8/11
6, 15 किंवा 24 तारखेला वाढदिवस: गुलाबी फुले किंवा सोन्याच्या नाण्यांसारख्या चमकदार वस्तू असलेला वॉलपेपर तुमच्याकडे यश आणि समृद्धी आणू शकतो.
advertisement
9/11
7, 16 किंवा 25 तारखेला वाढदिवस: श्री गणेशाच्या वॉलपेपर आपल्यासाठी सर्वात लकी ठरेल. ध्येय, यश मिळवून देऊ शकतो.
advertisement
10/11
8, 17 किंवा 26 तारखेला वाढदिवस: निळी फुले किंवा निळ्या रगांचे काही फोटो आपण वॉलपेपरसाठी वापरावे, जीवनात शिस्त येईल, तुमचे नशीब चमकू शकते.
advertisement
11/11
9, 18 किंवा 27 तारखेला वाढदिवस: आपल्यासाठी हनुमानाचा फोटो, लाल फुले आणि स्फटिक किंवा पर्वताचा वॉलपेपर यश आणि कीर्ती आणू शकतात.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Numerology: मोबाईलसाठी लकी वॉलपेपर! जन्मतारखेनुसार असे फोटो सेट केल्याने मिळेल शुभफळ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल