Astrology: 20 नोव्हेंबरपर्यंत 3 राशींचा लकी टाईम! हात घालेल त्या कामाला यश हमखास; बुध-शनिची युती
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
November Astrology: ज्योतिषशास्त्रात बुध ग्रहाला बुद्धिमत्ता, तर्कशास्त्र, वाणी, व्यवसाय आणि संवादाचा कारक मानले जाते. तर शनी लोकांच्या कर्मावर आधारित फळे देतो. सध्या ग्रहांचा राजकुमार बुध आणि न्यायदेव शनी यांच्यामध्ये अत्यंत दुर्मीळ युती जुळून आली आहे.
advertisement
1/5

ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार, बुध आणि शनि दोघेही सध्या अनुराधा नक्षत्रात आहेत आणि ही दुर्मीळ युती 20 नोव्हेंबरपर्यंत राहणार आहे. ज्योतिष तज्ज्ञांच्या मते अनुराधा नक्षत्रात बुध आणि शनिची युती तीन राशींना लकी ठरू शकते. या भाग्यवान राशींबद्दल जाणून घेऊया.
advertisement
2/5
मिथुन - शनी आणि बुधाची ही युती मिथुन राशीसाठी प्रगती आणि यशाच्या संधी आणेल. या काळात, तुमच्या वाणी आणि व्यक्तिमत्त्वात आकर्षण वाढेल. व्यवसायाशी संबंधित योजना यशस्वी होतील आणि अपूर्ण कामे पूर्ण होऊ शकतात. नोकरी करणाऱ्या लोकांनाही प्रगतीच्या संधी मिळतील.
advertisement
3/5
मिथुन राशीचे जे लोक बऱ्याच काळापासून नोकरीच्या शोधात आहेत त्यांना या काळात चांगली बातमी मिळू शकते. याव्यतिरिक्त, तुम्ही व्यावसायिक आणि कौटुंबिक जीवनात सुख अनुभवाल.
advertisement
4/5
कन्या - ही दुर्मीळ युती कन्या राशीच्या लोकांसाठी देखील सकारात्मक परिणाम आणेल. या काळात नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायिकांनाही नफा आणि नवीन संधींचा अनुभव येईल. विद्यार्थ्यांची अभ्यासात एकाग्रता वाढल्याने त्यांच्या यशाची शक्यता वाढेल. हा काळ अभ्यास करणाऱ्यांसाठी खूप अनुकूल असेल. कुटुंबात आनंद आणि समृद्धीचे वातावरण असेल. तुम्ही तुमच्या कुटुंबासह कुठंतरी सहलीला जाऊ शकता.
advertisement
5/5
मकर - मकर राशीच्या लोकांसाठी, अनुराधा नक्षत्रात बुध ग्रहाचा प्रवेश आर्थिक बळ आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरू शकतो. जुन्या योजना आता फळ देतील आणि व्यवसायाच्या प्रगतीचे नवीन मार्ग उघडतील. तुमच्या व्यवसायातील नफा दुप्पट होऊ शकतो. तुम्हाला कर्जातून मुक्तता मिळेल. अडकलेले किंवा हरवलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला मानसिक शांती मिळेल आणि कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून पाठिंबा मिळेल.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Astrology: 20 नोव्हेंबरपर्यंत 3 राशींचा लकी टाईम! हात घालेल त्या कामाला यश हमखास; बुध-शनिची युती