TRENDING:

Astrology: दृष्ट लागल्यासारखी अचानक संकटे! वक्री झालेला बुध या राशीच्या लोकांना भयंकर त्रास देणार

Last Updated:
Astrology: १८ जुलैपासून कर्क राशीत बुध ग्रह वक्री जाणार आहे. ११ ऑगस्टपर्यंत बुध वक्री स्थितीत राहील. बुधाची ही स्थिती काही राशींच्या जीवनावर नकारात्मक परिणाम करू शकते. विशेषतः करिअर आणि कौटुंबिक जीवनात या राशींना चढ-उतारांना सामोरे जावे लागेल. या राशींबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
advertisement
1/5
दृष्ट लागल्यासारखी अचानक संकटे! वक्री झालेला बुध या राशींना भयंकर त्रास देणार
मिथुन - बुध तुमच्या राशीचा स्वामी असून त्याच्या वक्री स्थितीमुळे तुमच्या करिअर आणि सामाजिक जीवनावर परिणाम होईल. या काळात समाजात तुमचा आदर कमी होऊ शकतो. तुम्ही वादात पडणे टाळावे. कामाच्या ठिकाणी तुमच्याकडून झालेली छोटीशी चूकही मोठे नुकसान करू शकते, सावध रहा. वडिलोपार्जित व्यवसाय करणाऱ्यांना कठोर परिश्रमानंतरच फायदा मिळेल.
advertisement
2/5
तूळ - कर्क राशीत बुध वक्री असल्यानं तुम्हाला कुटुंबात आव्हानांना सामोरं जावं लागू शकतं. या काळात तुमचे विचार कोणावरही लादू नका. करिअरमध्ये सहकारी तुमचे काम बिघडवण्याचा प्रयत्न करू शकतात, सावधगिरी बाळगा. काही लोकांना नको असली तरी त्यांना बदली घ्यावी लागू शकते. शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांची एकाग्रता कमी होऊ शकते, ज्यामुळे आव्हाने वाढतील. अनोळखी लोकांवर विश्वास ठेवणे टाळा.
advertisement
3/5
कुंभ - वक्री बुधामुळे जवळच्या लोकांशी गैरसमज होऊ शकतात. तुमचे विचार नीट मांडावे लागतील. या राशीच्या काही लोकांना व्यावसायिक भागीदारामुळे मोठे नुकसान होऊ शकते. नोकरी करणाऱ्यांची परिस्थिती देखील अस्थिर असू शकते. अफवांवर विश्वास ठेवू नका, अन्यथा दीर्घकाळ केलेले कष्टही वाया जाऊ शकतात. काही लोकांना आरोग्याच्या समस्या येऊ शकतात आणि त्यावर खूप पैसे खर्च करावे लागू शकतात, आरोग्याकडे लक्ष द्या.
advertisement
4/5
मीन - वक्री बुध आर्थिक बाजूवर परिणाम करेल. तुम्हाला पदोन्नती किंवा पगारवाढीची अपेक्षा असेल तर त्याला उशीर होऊ शकतो. या काळात कामाच्या ठिकाणी वारं तुमच्या विरोधात असण्याची शक्यता आहे, म्हणून प्रत्येक काम अत्यंत सावधगिरीने करा.
advertisement
5/5
मीन - या काळात काही लोकांचे त्यांच्या पालकांशी वाद देखील होऊ शकतात, तुमच्या प्रतिष्ठेच्या मर्यादा ओलांडू नका. प्रवास करताना तुमच्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या कारण त्या चोरीला जाऊ शकतात.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Astrology: दृष्ट लागल्यासारखी अचानक संकटे! वक्री झालेला बुध या राशीच्या लोकांना भयंकर त्रास देणार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल