TRENDING:

Mangal Gochar 2026: आत्तापासूनच सावधान! फेब्रुवारीच्या मध्यात मंगळ कुंभ राशीत; या राशींवर येणार तिहेरी संकट

Last Updated:
Mangal Gochar 2026: ज्योतिष शास्त्रामध्ये मंगळाला सगळ्या ग्रहांचा सेनापती मानलं जातं. सध्या मंगळ देव शनीच्या मकर राशीत बसलेले आहेत, पण येत्या काही दिवसांत ते शनीची दुसरी रास असलेल्या कुंभ राशीत शिरणार आहेत. ज्योतिषानुसार मंगळ हा साहस, ताकद आणि ऊर्जेचा कारक आहे, जो माणसाला निडर बनवतो.
advertisement
1/5
आत्तापासूनच सावधान! फेब्रुवारीच्या मध्यात मंगळ कुंभ राशीत; या राशींवर सलग संकटे
दुसरीकडे शनी देव हे कर्माचे फळ देणारे मानले जातात. विशेष म्हणजे मंगळ आणि शनी या दोन्ही ग्रहांमध्ये खूप मोठं वैर आहे. अशात जेव्हा सेनापती मंगळ आपल्या शत्रूच्या म्हणजेच शनीच्या राशीत प्रवेश करतील, तेव्हा साहजिकच त्याचे पडसाद उमटणार आहेत. ही ग्रहांची हालचाल काही राशींसाठी सावध राहण्याचा इशारा घेऊन येत आहे.
advertisement
2/5
द्रिक पंचांगानुसार, 23 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजून 33 मिनिटांनी मंगळ कुंभ राशीत प्रवेश करेल. या बदलाचा परिणाम प्रत्येक राशीवर कमी-अधिक प्रमाणात होईल, पण काही राशींना मात्र या काळात आर्थिक किंवा मानसिक त्रासाला सामोरे जावे लागू शकते. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या राशींनी या काळात विशेष काळजी घेतली पाहिजे.
advertisement
3/5
वृषभ - मंगळाची ही चाल वृषभ राशीच्या लोकांसाठी कामाच्या ठिकाणी टेन्शन वाढवणारी ठरू शकते. ऑफिसमध्ये मोठ्या साहेबांशी किंवा सहकाऱ्यांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. घाईघाईत घेतलेला कोणताही निर्णय फायद्याऐवजी नुकसानच जास्त करेल. जर तुम्ही तुमच्या रागावर ताबा मिळवला नाही, तर हाताशी आलेलं काम बिघडू शकतं. या काळात संयम ठेवणं तुमच्यासाठी खूप गरजेचं आहे.
advertisement
4/5
वृश्चिक - या राशीच्या लोकांनी आतापासूनच सावध झालेलं बरं. घरामध्ये कुरबुरी वाढू शकतात आणि चिडचिडेपणामुळे चुकीचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. गाडी किंवा जमिनीच्या व्यवहारात फसवणूक होणार नाही याची काळजी घ्या. जोडीदाराशी किंवा बिझनेस पार्टनरशी छोटी-मोठी भांडणं होऊ शकतात. तुमचं म्हणणं दुसऱ्यावर लादण्याचा प्रयत्न करू नका, नाहीतर नात्यात दुरावा येईल.
advertisement
5/5
कुंभ - मंगळ तुमच्याच राशीत येत असल्यामुळे तुमच्या अंगात ऊर्जा तर खूप येईल, पण सोबत राग आणि उतावीळपणा सुद्धा असेल. अतिआत्मविश्वास नडण्याची शक्यता आहे, त्यामुळे लोकांशी वाद घालणं टाळा, वाद होऊ नयेत याची काळजी घ्या. विचार न करता कोणतंही पाऊल उचललं तर नुकसान तुमचंच होईल. शांत राहून काम करणं तुमच्या फायद्याचं ठरेल.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Mangal Gochar 2026: आत्तापासूनच सावधान! फेब्रुवारीच्या मध्यात मंगळ कुंभ राशीत; या राशींवर येणार तिहेरी संकट
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल