Surya Nakshatra: विशाखार्क..! गुरुच्या नक्षत्रात सूर्याचं गोचर, 6 नोव्हेंबरपासून या राशींचे दिवस पालटणार
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Surya Gochar 2025: ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचे राशी आणि नक्षत्र परिवर्तन ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. दर महिन्याप्रमाणेच नोव्हेंबरमध्ये राशी बदलण्यापूर्वी सूर्यदेव आपले नक्षत्र बदलणार आहेत. सूर्य आजच गुरूच्या विशाखा नक्षत्रात संक्रमण करेल. पंचागानुसार याला विशाखार्क असंही म्हणतात. गुरूच्या नक्षत्रात प्रवेश केल्यानं तीन राशींना शुभ परिणाम मिळतील.
advertisement
1/5

ग्रहांचा स्वामी सूर्याची चाल बदलते तेव्हा त्याचा परिणाम जगावर, हवामानावर आणि राशीचक्रावरही होतो. कार्तिक पौर्णिमेनंतर, 6 नोव्हेंबर रोजी दुपारी 5:59 वाजता सूर्य स्वाती नक्षत्रातून विशाखा नक्षत्रात जाईल.
advertisement
2/5
ज्योतिषतज्ज्ञांच्या मते, गुरू हा विशाखा नक्षत्राचा अधिपती आहे. हे नक्षत्र तूळ आणि वृश्चिकशी संबंधित आहे. म्हणून, या नक्षत्रात प्रवेश केल्यानं सूर्य काही राशींना लाभ देईल. या शुभ राशींबद्दल जाणून घेऊ.
advertisement
3/5
मेष - आपले नक्षत्र बदलल्यानं सूर्य मेष राशीच्या लोकांचे जीवन नवीन उंचीवर नेईल. काम आणि व्यवसायाला गती मिळेल आणि रखडलेले प्रकल्प पूर्ण होऊ लागतील. यावेळी नवीन जबाबदाऱ्या किंवा उच्च स्थान देखील मिळू शकते.
advertisement
4/5
सिंह - सूर्याच्या नक्षत्रातील बदल तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. सूर्य तुमच्या राशीचा स्वामी ग्रह आहे आणि त्यामुळे विशाखा नक्षत्रात त्याचे आगमन तुम्हाला महत्त्वपूर्ण फायदे देईल. या काळात तुमच्या समस्या एकामागून एक सुटल्या जातील.
advertisement
5/5
वृश्चिक - सूर्याचे नक्षत्रात होणारे भ्रमण तुमच्यासाठीही शुभ ठरू शकते. जे लोक बऱ्याच काळापासून नोकरीच्या शोधात आहेत त्यांना यश मिळेल. कर्ज आणि कायदेशीर अडचणींपासून मुक्तता मिळेल, ज्यामुळे तुमचे जीवन आनंदी-सुखी होईल.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Surya Nakshatra: विशाखार्क..! गुरुच्या नक्षत्रात सूर्याचं गोचर, 6 नोव्हेंबरपासून या राशींचे दिवस पालटणार