अखेर वेळ आलीच! मंगळाची मकर राशीत एंट्री, 'या' राशीच्या लोकांना होणार तिप्पट फायदा
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
मंगळ हा ऊर्जा, धाडस, जमीन आणि पराक्रमाचा कारक आहे. जेव्हा मंगळ मकर राशीत येतो, तेव्हा तो अत्यंत शक्तिशाली होतो. या गोचरामुळे मकर राशीत 'रुचक नावाचा महापुरुष राजयोग' निर्माण होत आहे.
advertisement
1/7

ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा सेनापती मानला जाणारा 'मंगळ' 17 जानेवारी 2026 रोजी धनु राशीतून बाहेर पडून आपल्या उच्च राशीत म्हणजेच मकर राशीत प्रवेश करत आहे. मंगळ हा ऊर्जा, धाडस, जमीन आणि पराक्रमाचा कारक आहे. जेव्हा मंगळ मकर राशीत येतो, तेव्हा तो अत्यंत शक्तिशाली होतो. या गोचरामुळे मकर राशीत 'रुचक नावाचा महापुरुष राजयोग' निर्माण होत आहे.
advertisement
2/7
मंगळाचे हे राशी परिवर्तन काही राशींसाठी सुवर्णकाळ घेऊन आले आहे. विशेषतः 5 राशींच्या जातकांना या काळात भाग्याची भक्कम साथ मिळेल आणि कामात तिप्पट नफा होण्याची शक्यता आहे.
advertisement
3/7
कर्क: व्यवसायात मोठी झेप कर्क राशीच्या सातव्या भावात मंगळाचे भ्रमण होत आहे. जे लोक भागीदारीत व्यवसाय करत आहेत, त्यांना मोठा आर्थिक नफा होईल. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी ही सर्वोत्तम वेळ आहे. जोडीदारासोबतचे संबंध सुधारतील आणि समाजात मान-सन्मान वाढेल. तुमच्या शत्रूंचा पराभव होईल.
advertisement
4/7
मेष: करिअरमध्ये सुवर्णसंधी मेष राशीचा स्वामी स्वतः मंगळ असून तो तुमच्या दहाव्या भावात प्रवेश करत आहे. नोकरीत मोठी पदोन्नती किंवा पगारात मोठी वाढ मिळण्याचे संकेत आहेत. सरकारी कामात अडकलेले पैसे परत मिळतील. अधिकारी वर्गाशी तुमचे संबंध सुधारतील आणि तुमचे वर्चस्व वाढेल.
advertisement
5/7
वृश्चिक: पराक्रम आणि विजय वृश्चिक राशीचा स्वामीही मंगळ आहे आणि तो तुमच्या तिसऱ्या भावात गोचर करत आहे. तुमच्या धाडसात वाढ होईल. भावा-बहिणींचे सहकार्य लाभेल. जमिनीशी संबंधित व्यवहारात तुम्हाला अनपेक्षित फायदा होऊ शकतो. लहान प्रवासातून आर्थिक लाभ होण्याचे योग आहेत.
advertisement
6/7
धनु: धनसंपत्तीत वाढ मंगळ तुमच्या दुसऱ्या भावात प्रवेश करत आहे. तुमची आर्थिक बाजू अत्यंत मजबूत होईल. बचत करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. बोलण्यातील स्पष्टता आणि आत्मविश्वासामुळे तुम्ही कठीण कामेही पूर्ण करून घ्याल. वारसाहक्काने मिळालेल्या मालमत्तेचे प्रश्न सुटतील.
advertisement
7/7
मकर: नेतृत्व आणि प्रतिष्ठा मंगळ तुमच्याच राशीत प्रवेश करत असल्याने 'रुचक राजयोग' तुमच्यासाठी सर्वाधिक फलदायी ठरेल. तुमचे व्यक्तिमत्त्व अधिक प्रभावशाली होईल. नवीन जबाबदाऱ्या मिळतील ज्या तुम्ही उत्तमरीत्या पार पाडाल. आरोग्यात सुधारणा होईल आणि जुन्या व्याधींपासून मुक्ती मिळेल. घर किंवा नवीन गाडी खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण होईल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
अखेर वेळ आलीच! मंगळाची मकर राशीत एंट्री, 'या' राशीच्या लोकांना होणार तिप्पट फायदा