'इथे फक्त भाऊगिरी चालणार', भाऊच्या धक्क्यावर रितेशचं कमबॅक, आल्याआल्या घेतलं सगळ्यांना फैलावर
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Riteish Deshmukh - Bhaucha Dhakka : अभिनेता रितेश देशमुखनं बिग बॉस मराठी 6 च्या पहिल्या भाऊच्या धक्क्यावर कमबॅक केलं आहे. हा भाऊचा धक्का रितेश आणखी धमाकेदारा करणार आहे.
advertisement
1/7

अभिनेता रितेश देशमुख बिग बॉस मराठी 6 मधून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. विकेंडला भाऊच्या धक्क्यावर रितेशचं जोरदार कमबॅक झालं आहे. रितेशला पुन्हा भाऊच्या धक्क्यावर पाहण्यासाठी त्याचे चाहते आतूर झाले आहेत. भाऊच्या धक्क्यावर येताच रितेशने त्याचा खरा अवतार सगळ्यांना दाखवला आहे. रितेशनं आल्या आल्या भाऊच्या धक्क्यावर सगळ्यांची शाळा घेतली.
advertisement
2/7
'भाऊचा धक्का' या विशेष भागात रितेश देशमुख स्पर्धकांच्या वागणुकीवर चांगलाच संताप व्यक्त केला. विशाल आणि ओमकार तसंच तन्वी आणि रुचिता यांची जोरदार शाळा घेतली.
advertisement
3/7
घरात सुरू असलेली धक्काबुक्की, धमक्या आणि आक्रमक वर्तन पाहून रितेश भाऊंनी स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली. "बोलण्यासाठी काहीच नाही का? फक्त मारामारी, बॉडीचा आणि ताकदीचा माज, एकमेकांवर धावून जाणं, धक्काबुक्की, धमक्या… हाच आदर्श प्रेक्षकांना देणार आहात का?" म्हणत रितेशनं ओमकार आणि विशालला झापलं.
advertisement
4/7
रितेश पुढे म्हणाला, "विशाल आणि ओमकार, नीट ऐका. हे घर आहे, रस्त्यावरचा नाका नाही. इथे दादागिरी चालणार नाही. लक्षात ठेवा, हे माझं घर आहे आणि इथे फक्त 'भाऊगिरी' चालणार."
advertisement
5/7
रितेश देशमुख तन्वी कोलतेवरही चिडला. "तन्वी कोलते किती बोलते… तुम्ही आहात या घराची तंटा क्वीन. तुम्हाला फक्त बोलायचं, भांडायचं आणि मग रडायचं. तुमच्या जिभेचा ब्रेक फेल झालेला आहे." तन्वी स्वतःची बाजू मांडण्याचा प्रयत्न करत असतानाच रितेश "मी बोलतोय, थांबा एक मिनिट" असं म्हणत तिला गप्प केलं.
advertisement
6/7
याशिवाय रुचिताच्या वागण्यावरही रितेशनं तिला टोला लगावला. रितेश म्हणाला, "तुम्ही स्वत:ला वाघिण म्हणवता, महाराष्ट्राने पहिल्यांदाच स्वतःलाच पंजा मारणारी वाघीण पाहिली. महाराष्ट्राला वाटलं होतं तुम्ही या घराचा Voice व्हाल, पण सध्या तुम्ही फक्त Noise आहात.'
advertisement
7/7
रितेश देशमुखचा 'भाऊचा धक्का' प्रेक्षकांमध्ये चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. आजचा एपिसोड पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'इथे फक्त भाऊगिरी चालणार', भाऊच्या धक्क्यावर रितेशचं कमबॅक, आल्याआल्या घेतलं सगळ्यांना फैलावर