Mobile Number Last Digit: मोबाईल नंबरच्या शेवटी हा अंक असणं भाग्याचं काम! शनि महाराजांची थेट राहते कृपा
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Mobile Number Last Digit: अंकशास्त्रात प्रत्येक अंकाचे विशेष महत्त्व आहे. प्रत्येक ग्रहांशी अंकांचा संबंध असतो, काही अंक थेट न्यायदेवता शनि महाराजांशी संबंधित आहेत. शनिदेवाला कर्मफळदाता म्हटलं जातं. जर तुमच्या मोबाईल नंबरचा शेवटचा अंक शनिशी संबंधित असेल तर मोबाईल अंकशास्त्रात त्याचा अर्थ खास मानला जातो. तुमच्या मोबाईल नंबरच्या शेवटच्या अंकावरून तुम्हाला कॉल करणाऱ्या लोकांबद्दल तुम्ही थोडा अंदाज लावू शकता. व्यवसायात असलेल्यांना तर हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे.
advertisement
1/7

मोबाईल नंबरच्या शेवटच्या अंकाचा अर्थ - तुमच्या मोबाईल नंबरचा शेवटचा अंक 8 असेल तर तुम्हाला येणारे कॉल फक्त कामासाठी असतात. काहीजण 8 अंकाला अशुभ मानतात, पण तसं प्रत्यक्षात नाही. कारण हा शनिचा अंक आहे. जो कोणी तुम्हाला कॉल करेल तो त्याचा उद्देश तुम्हाला सांगेल आणि तुम्ही दिलेल्या सल्ल्यानुसार तो उत्तर देईल आणि पुढे जाईल. तो निरुपयोगी गोष्टी बोलणार नाही.
advertisement
2/7

3/7
जर एखाद्या व्यावसायिकाच्या मोबाईल नंबरचा शेवटचा अंक 8 असेल तर त्याचे ग्राहक जास्त बार्गेनिंग करणार नाहीत, ते थेट उत्पादनाची माहिती घेतील आणि त्यांना जे काही ऑर्डर द्यायची आहे ते देऊन रिकामे होतील.
advertisement
4/7
शिवाय तुम्हाला कॉल करणारा घाईघाईने बोलणार नाही. तो आरामात बोलेल. त्याची बोलण्याची गती थोडी मंद असेल. तुम्हाला त्याच्या बोलण्यात थोडा विराम जाणवेल. असे ग्राहक पैसे देणारे असतात. ग्राहकांशी तुमचा संवाद लगेच पूर्ण होईल आणि व्यवहारही निश्चित होईल.
advertisement
5/7
मोबाईल नंबरच्या शेवटी 8 असल्यास हा नंबर सर्वांना दरवेळी समान फायदे देतोच असं नाही. तुमच्या मूलांक आणि भाग्य क्रमांकाच्या आधारावर तो असल्यास अधिक चांगले काम करतो.
advertisement
6/7
अंकशास्त्रात, 8 नंबर हा एक असा अंक आहे जो अनंत शक्यता प्रदान करतो. या संख्येच्या बळावर, तुम्ही पैसे, संपत्तीपासून सर्वकाही मिळवू शकता. हा अंक शनिचा असल्यानं लोक घाबरतात, परंतु तसं नाही. 8 नंबरचा योग्य वापर कसा करायचा हे तुम्हाला माहित असले पाहिजे. 8 नंबर तुमच्या आयुष्यात स्थिरता आणि सुरक्षिततेची भावना वाढवतो.
advertisement
7/7
जर तुमच्या मोबाईल क्रमांकाचा शेवटचा अंक 8 असेल, तर तुम्ही तुमच्या ज्ञानाच्या आधारे सर्वकाही साध्य करू शकाल. तुम्ही सर्व गोष्टींचा हिशेब योग्यरित्या ठेवता. परिस्थिती काहीही असो, तुम्ही असे व्यक्ती आहात, सगळ्या गोष्टींचे योग्य मूल्यांकन केल्यानंतरच पावले उचलतात.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Mobile Number Last Digit: मोबाईल नंबरच्या शेवटी हा अंक असणं भाग्याचं काम! शनि महाराजांची थेट राहते कृपा