Money Mantra: शुक्रवार या राशींसाठी भाग्याचा! भविष्याविषयीची चिंता मिटेल; आर्थिक लाभाचे योग
- Published by:Ramesh Patil
- Written by:Bhoomika Kalam
Last Updated:
Money Horoscope Marathi: आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं आजच्या दिवसाचं (04 ऑक्टोबर 2024) राशीभविष्य
advertisement
1/12

मेष (Aries) : नोकरीच्या ठिकाणी आज अधिकाऱ्यांबरोबर वाद होण्याची शक्यता आहे; मात्र बोलण्यावर नियंत्रण ठेवा. बराच काळ रखडलेलं एखादं काम आज संध्याकाळपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमचं मन आनंदी होईल.उपाय : पांढरे कपडे घालून लक्ष्मीची प्रार्थना करा.
advertisement
2/12
वृषभ (Taurus) : कामाच्या ठिकाणी काळजीपूर्वक काम करा. व्यवसायात एखादं डील ठरलेलं असेल, तर अनेकदा विचार करा. अन्यथा अशा डील्सचा भविष्यात त्रास होऊ शकतो.उपाय : कडुनिंबाच्या झाडाला पाणी घाला.
advertisement
3/12
मिथुन (Gemini) : आजचा दिवस तुमच्यासाठी विशेष असेल. कारण व्यवसायात काही तरी नवं करण्याचा विचार आज कराल आणि त्यातून निश्चित फायदा होईल. एखादं कर्ज सुरू असेल, तर परतफेडीमध्ये आज थोडं यश येईल. कामासंदर्भात मनात नवीन नियोजन सुरू कराल. आज काही तरी नवं शिकण्याची संधी तुम्हाला मिळेल; पण अनावश्यक खर्च टाळा.उपाय : पांढरे कपडे, पीठ, तांदूळ, साखर यांसारख्या वस्तू दान करा.
advertisement
4/12
कर्क (Cancer) : व्यवसायात आज वाढ होईल. काही काम झालं, तर मन आनंदी होईल. नोकरदार व्यक्तींच्या सहकाऱ्यांच्या भावना आज तीव्र राहतील. आज धार्मिक कार्यांवर काही पैसे खर्च कराल.उपाय : श्री विष्णू आणि लक्ष्मी यांची प्रार्थना करा.
advertisement
5/12
सिंह (Leo) : व्यवसायात आज नव्या संधी मिळण्याची शक्यता आहे. त्याचा भविष्यात फायदा होईल. आर्थिक स्थिती मजबूत करण्यात तुम्हाला यश येईल. त्यामुळे तुमची भविष्याविषयीची चिंता कमी होईल. विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये काही आर्थिक अडचणी येण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी मित्रांच्या सहकार्याने अनुकूल वातावरण तयार करता येईल. समजूतदारपणा आणि विवेकाच्या आधारे तुम्ही घेतलेल्या निर्णयात तुम्हाला यश मिळेल.उपाय : लक्ष्मीला बत्तासे, मखाणे आणि कवड्या अर्पण करा.
advertisement
6/12
कन्या (Virgo) : आज विनाकारण तुमचे नवे शत्रू तयार होतील; पण ते तुम्हाला कोणताही त्रास देऊ शकणार नाहीत. तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत राहील. काही पैशांची बचत करू शकाल.उपाय : चंदनाचा टिळा लावा आणि भगवान शंकरांवर तांब्याच्या भांड्यातून जलाभिषेक करा.
advertisement
7/12
तूळ (Libra) : राजकीय स्पर्धेत यश मिळेल आणि तुमचं कामही वेळेत पूर्ण होईल. एखादं कर्ज घेण्याचा विचार करत असाल, तर आज ते सहज घेता येईल. नोकरदार व्यक्तींच्या अधिकारांमध्ये वाढ होईल. वरिष्ठ अधिकारी त्यांच्यावर खूश असतील; पण संध्याकाळी कोणत्याही वादविवादात अडकू नका. तो वाद कोर्टात जाऊ शकतो.उपाय : घराच्या मुख्य दरवाज्यावर गुलालाची उधळण करून दोन वातींचा दिवा लावावा.
advertisement
8/12
वृश्चिक (Scorpio) : आजचा दिवस वेगळ्या पद्धतीने फायदेशीर ठरेल. सासरकडच्या एखाद्या व्यक्तीला पैसे कर्जाऊ दिले असतील, तर ते आज मिळतील. व्यवसायात जास्त नफा मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायासंदर्भात आज प्रवास करावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्हाला यश मिळेल. आज अनपेक्षितरीत्या एखादा नेता किंवा मोठ्या अधिकाऱ्याची भेट घडेल.उपाय : लक्ष्मीमातेला केशर घातलेल्या खिरीचा नैवेद्य दाखवा.
advertisement
9/12
धनू (Sagittarius) : आज तुमच्या ज्ञानात भर पडेल आणि कामातल्या अडचणीही दूर होतील. नव्या व्यवसायाबाबत नवं नियोजन कराल आणि त्यात तुम्हाला निश्चितपणे यशही मिळेल.उपाय : कमळगट्ट्याची माळ घेऊन लक्ष्मीचे मंत्र म्हणा.
advertisement
10/12
मकर (Capricorn) : तुमची क्षमता आज वाढेल. त्यामुळे तुमची प्रसिद्धी सर्वत्र होईल आणि तुमच्या शत्रूंचा नाश होईल. व्यवसायात कोणताही आर्थिक व्यवहार करण्याबाबत सावधगिरी बाळगा. अन्यथा पैसे अडकून पडण्याची शक्यता आहे. नोकरीच्या शोधात असलेल्यांना आज नव्या संधी मिळतील.उपाय : लक्ष्मीची उपासना करा आणि शमीपत्रं वाहा.
advertisement
11/12
कुंभ (Aquarius) : जुनी, अडकलेली कामं पूर्ण होण्याची आज दाट शक्यता आहे; पण तुम्हाला आळस झटकला पाहिजे. इतरांसमोर आज तुम्ही तुमचा मुद्दा सिद्ध करू शकाल. व्यवसायासंदर्भातल्या एखाद्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी मिळेल. मनात शुभ भावना जागृत होतील.उपाय : गरिबांना अन्न आणि कपडे दान करा.
advertisement
12/12
मीन (Pisces) : व्यवसायाच्या दृष्टिकोनातून आजचा दिवस अनुकूल राहण्याची शक्यता आहे. आर्थिक नफाही आज जास्त मिळू शकतो. एखादा नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, तर त्यातही तुम्हाला यश मिळू शकतं.उपाय : लोखंडी भांड्यात पाणी, साखर, दूध व तूप एकत्र करून ते मिश्रण पिंपळाच्या मुळाशी घाला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Money Mantra: शुक्रवार या राशींसाठी भाग्याचा! भविष्याविषयीची चिंता मिटेल; आर्थिक लाभाचे योग