TRENDING:

Narak Chaturdashi 2025: यमराजाचा कोप! नरक चतुर्दशीला केलेल्या या चुका दिवाळीच्या आनंदावर विरजन घालतील

Last Updated:
Narak Chaturdashi 2025: नरक चतुर्दशीच्या दिवशी दिपावलीचा सण साजरा केला जातो. नावाप्रमाणेच (नरक) या दिवशी मृत्यूचा देव यम याच्या पूजेसाठी समर्पित सण आहे. त्याची पूजा केल्यास कुटुंबात अकाली मृत्यूचे भय दूर करतो आणि घरात आनंद, समृद्धी आणि संरक्षण आणतो. या दिवशी, संध्याकाळच्या प्रदोष काळात घराच्या एका कोपऱ्यात चारमुखी असलेला दिवा लावावा आणि पूजा केल्यानंतर, तो दक्षिण दिशेला ठेवणे शुभ असते. नरक चतुर्दशीला यमासाठी दिवा लावल्यानं कुटुंबातील मृत्यूचे भय दूर होते. हा सण घरात आनंद, समृद्धी आणि संरक्षण आणतो, असं मानलं जातं.
advertisement
1/5
यमराजाचा कोप! नरक चतुर्दशीला केलेल्या या चुका दिवाळीच्या आनंदावर विरजन घालतील
यमासाठी दिवा लावण्याचा शुभ काळ संध्याकाळचा प्रदोष कालावधी आहे. हा काळ खूप शुभ मानला जातो आणि पूजा केल्यानं शुभ फळे मिळतात. शिवाय नरक चतुर्दशीला काही गोष्टी टाळाव्यात.
advertisement
2/5
नरक चतुर्दशीला, यमासाठी मोठा मातीचा दिवा लावा. दिव्याला चार तोंडे आणि चार वाती असाव्यात. दिव्यामध्ये मोहरीचे तेल घालावे, यमासाठी लावलेला दिवा घरात सर्वत्र फिरवून नंतर जागेवर ठेवावा.
advertisement
3/5
या दिवशी घराच्या प्रत्येक कोपऱ्यात दिवे लावावे. वाईट शक्तींपासून त्यामुळं संरक्षण मिळतं. दिवा लावल्यानं घरात शांती आणि आनंद येतो आणि यमराजाच्या आशीर्वादाने कुटुंब सुरक्षित राहते.
advertisement
4/5
दिवा लावल्यानंतर तो घराबाहेर दक्षिण दिशेला ठेवावा. दक्षिण दिशा यमराजाचे निवासस्थान आहे. तेथे दिवा लावल्यानं मृत्यूचे भय दूर होते आणि यमराजाचे आशीर्वाद मिळतात.
advertisement
5/5
या दिवशी पूजा करताना हनुमान चालीसा पठण करणे आवश्यक आहे. यामुळे घरातील सर्व अडचणी दूर होतात आणि कुटुंबात सकारात्मक ऊर्जा राहते. घरातील सर्वांनी या पूजेमध्ये सहभागी व्हावे. दक्षिण दिशेला घराबाहेर दिवा लावल्यानंतर, त्याच्या जवळ जाऊ नये.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Narak Chaturdashi 2025: यमराजाचा कोप! नरक चतुर्दशीला केलेल्या या चुका दिवाळीच्या आनंदावर विरजन घालतील
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल