TRENDING:

ShaniDev: ऑक्टोबरच्या सुरुवातीपासूनच शनिदेव पावणार! 27 वर्षांनी गुरुच्या नक्षत्रात एंट्री; 3 राशींना अर्थलाभ

Last Updated:
ShaniDev: वैदिक ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला दंडाधिकारी आणि कर्मफळदाता मानले जाते. तसेच, शनिदेवाला वय, दुःख, रोग, वेदना, विज्ञान, तंत्रज्ञान, लोह, खनिज तेल, कर्मचारी, नोकर, तुरुंग इत्यादींचा कारक मानले जाते. म्हणजेच, शनिदेवाचे या क्षेत्रांवर वर्चस्व असते. जेव्हा जेव्हा शनिदेवाच्या चालीत बदल होतो. तेव्हा या क्षेत्रांवर विशेष परिणाम होतो.
advertisement
1/5
ऑक्टोबरच्या सुरुवातीला शनिदेव पावणार! गुरुच्या नक्षत्रातील शनी या राशींना लकी
शनिदेव सध्या उत्तराभाद्रपद नक्षत्रात भ्रमण करत असून 3 ऑक्टोबर रोजी पूर्वभाद्रपद नक्षत्रात प्रवेश करतील. या नक्षत्राचा स्वामी गुरू आहे. त्यामुळे काही राशींसाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात. तसेच या राशींना करिअर आणि व्यवसायात प्रगती मिळू शकते. जाणून घ्या या भाग्यवान राशी कोणत्या आहेत.
advertisement
2/5
मिथुन रास - तुमच्यासाठी, शनिदेवाच्या नक्षत्रातील बदल फायदेशीर ठरू शकतो. कारण शनिदेव तुमच्या राशीपासून करिअर आणि व्यवसायाच्या ठिकाणी संक्रमण करत आहेत. यावेळी तुम्हाला काम आणि व्यवसायात प्रगती मिळू शकते. या काळात नवीन भागीदारी आणि व्यवसायात यश मिळण्याची शक्यता आहे. या काळात आत्मविश्वास वाढेल, करिअरमध्ये प्रगती दिसून येईल. वरिष्ठ कामाच्या ठिकाणी तुमच्या कष्टाचे कदर करतील. व्यावसायिकांना चांगले पैसे मिळू शकतात.
advertisement
3/5
कुंभ - शनिदेवाच्या नक्षत्रातील बदल तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. कारण शनिदेव तुमच्या राशीतून दुसऱ्या घरात संक्रमण करत आहेत. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. यासोबतच, तुम्हाला आदर आणि प्रतिष्ठा मिळेल. नोकरी करणाऱ्या लोकांना आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही, सगळीकडून नफा मिळेल. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात आनंद राहील. तुम्हाला वेळोवेळी अचानक पैसे मिळू शकतात. तसेच, या काळात, तुमच्या बोलण्याचा प्रभाव वाढेल. तुमची आर्थिक स्थिती सुधारेल.
advertisement
4/5
मकर - शनिदेवाच्या नक्षत्रातील बदल मकर राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकतो. कारण शनिदेव तुमच्या राशीपासून तिसऱ्या स्थानावर भ्रमण करत आहे. त्यामुळे या काळात तुमच्या शौर्यात वाढ होऊ शकते. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अभ्यासात यश मिळविण्यासाठी आणि नवीन कौशल्ये शिकण्यासाठी अनुकूल राहील.
advertisement
5/5
मकर राशीच्या लोकांना या काळात भावंडांचा पाठिंबा मिळू शकेल. या काळात तुम्ही खूप प्रवास कराल आणि हे प्रवास फायदेशीर ठरतील. कौटुंबिक जीवनात सुधारणा दिसून येईल. या काळात तुमच्या नियोजित योजना यशस्वी होतील.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
ShaniDev: ऑक्टोबरच्या सुरुवातीपासूनच शनिदेव पावणार! 27 वर्षांनी गुरुच्या नक्षत्रात एंट्री; 3 राशींना अर्थलाभ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल